Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये उत्साह, आनंद आणि प्रेरणेच्या वातावरणात फातिमा शेख जयंती साजरी

 उपसंपादक- नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी


भारताच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका, स्त्री शिक्षणात क्रांती घडविणाऱ्या सावित्री बाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करून जयंती अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.


“शिक्षण हा हक्क आहे” हा संदेश कृतीत उतरवत, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यातून आणि मैदानात दिसलेल्या आत्मविश्वासातून फातिमा शेख यांच्या विचारांची जिवंत अनुभूती मिळाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस राजेंद्र विठ्ठल थोरात,नितीन माणिक वाघ दत्तात्रय कांबळे,ऋतुजा कांबळे, भग्यश्री लोहकरे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याला आदरांजली वाहण्यात आली.


धावण्याच्या शर्यती,बेडूक उड्या, लिंबू-चमचा, अशा खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक खेळामध्ये केवळ विजय नव्हे तर संघभावना, शिस्त, समता आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.


खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व तर कळलेच, पण “स्वप्न पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे बळ” मिळाले. 

फातिमा शेख यांचा शिक्षणाचा दीप आजही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात उजळत आहे, आणि हाच दीप पुढील पिढ्यांना उजेडाकडे घेऊन जाणार आहे, अशी भावना या कार्यक्रमातून फिनिक्स स्कूल च्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा