Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १८ जानेवारी, २०२६

*भूसंपादित जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


करमाळा तालुक्यातील उजनी धरण क्षेत्राच्या परिसरातील कंदर भागामध्ये असलेल्या उजनी धरणाच्या भूसंपादित जमिनीवर नांगरट करणाऱ्या संशयीताविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.




शब्बीर बाबासाहेब जागीरदार रा. कंदर ता. करमाळा जिल्हा सोलापूर असे संशयित आरोपीचे नाव असून योगेश अशोक मोरे वय 30 शाखा अधिकारी भीमा उपसा सिंचन कंदर सध्या रा. शितल नगर टेंभुर्णी यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतची हकीगत अशी की कंदर येथील उजनी धरणाच्या भूसंपादित क्षेत्रात संशयित आरोपी शब्बीर बाबासाहेब जागीरदार याने गट क्रमांक 412/02 खाते क्रमांक 109 मध्ये तब्बल 83 हेक्टर जमीन नांगरून कसंत असल्याची माहिती मिळाल्याने उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता नागेश जडे, कालवा निरीक्षक इमरान अब्बास तांबोळी व शाखा अभियंता योगेश अशोक मोरे हे तिघेजण अतिक्रमणित जमिनीमध्ये पाहणी करण्यास गेले. या ठिकाणी शब्बीर जाहीरदार यांनी सांगितले की, ही जमीन मी खरेदी केलेली आहे. ती मी कसणार आहे. असे या तिन्ही  अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी गावातील अनेक लोकही तिथे उपस्थित होते. असे फिर्यादीत नमूद केली आहे. सदर भूसंपादित जागेवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्याने याची माहिती कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग यांना देण्यात आली आहे. संशयित आरोपी यांना सदरची जमीन ही भूसंपादित असल्याची माहिती असतानाही त्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे योगेश मोरे यांनी करमाळा पोलिसांमध्ये शासकीय जमिनीवर , भूसंपादित जमिनीवर अतिक्रमण केल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत करमाळा पोलिसात संशयित आरोपी शब्बीर जागीरदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास हवालदार विठ्ठल पठाडे हे करीत आहेत.

**

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा