*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
काल परवा एकला चलो रे नारा देणारे संजयमामा करमाळा तालुक्यातील गटा तटांच्या राजकारणापुढे शरणागत झाले असल्याचा घणाघात पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काल भाजपा व राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट) यांची युती झाल्याची चर्चा सोशल मीडिया वर दिवसभर चालू होती. यावर आमदार नारायण आबा पाटील गटाकडून आज प्रतिक्रिया देण्यात आली. याबाबत अधिक सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले की कोणत्याच पक्षाला न जुमानता विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहणारे संजयमामा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पुढे नतमस्तक झालो. त्यांनी गण व गट निहाय बैठका घेतल्या व उमेदवारांची चाचपणी केली. परंतू त्यांना काडीचाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आता परत एकदा करमाळा तालुक्यातील बागल गटापुढे नतमस्तक झाले आहेत. काल परवा करमाळा तालुक्यातील गटातटाच्या राजकारणास नावे ठेवत माजी आमदार हे सुसाट वेगाने एकला चलो रे असे ओरडत धावत होते. पण एकाकी त्यांनी भुमिका बदलली व युती करण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा करमाळा तालुक्यातील राजकारणापुढे लवून नतमस्तक झाल्यानंतर आता यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठीत मणके उरले आहेत की नाही याबाबत वैद्यकीय तपासणी करावीच लागेल. उगीचच करमाळा तालुक्यातील राजकीय गटांना व गट नेतृत्वांना नावे ठेवायचे उद्योग माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आता बंद करावेत. आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही सर्व उमेदवार निवडुणच येणार असल्याचा दावा यावेळी तळेकर यांनी केला. तसेच आमदार नारायण आबा पाटील गटात इनकमींग चालू राहणार असुन लवकरच एक धमाका तालूक्याला पहायला मिळणार असल्याचे सुचक वक्तव्य सुनील तळेकर यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा