Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ मोहिनी सावंत यांनी आज स्वीकारला

 *करमाळा-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



करमाळा नगरपालिकेचा पदभार आज शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोहिनी संजय सावंत यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे यांच्याकडून स्वीकारला 

 

करमाळा नगरपालिकेच्या अटीचटीच्या निवडणुकीमध्ये सावंत गटाच्या शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासहित एकूण आठ जागेवर वर्चस्व सिद्ध केले होते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोहिनी सावंत यांनी सर्वाधिक मते मिळवून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये त्यांना व त्यांच्या गटाच्या सर्व नगरसेवकांना करमाळा शहरातील मतदारांनी मते देऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला होता 


आज नगराध्यक्ष पदाचा पदभार सौ सावंत यांनी करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे यांच्याकडून स्वीकारला यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की करमाळा शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून शहरवासीयांनी दिलेल्या अभुतपूर्व यशामुळेच मी आज नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आहे मी शहरातील प्रत्येक वर्गातील समस्या जातीने सोडवणार असून भविष्यात चांगले कामकाज करून करमाळा नगरपालिकेचे नाव संपूर्ण राज्यात पोहचविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल असे बोलताना सौ सावंत म्हणाल्या




यावेळी नगरसेवक संजय सावंत सावंत गटाचे युवा नेते पैलवान सुनील बापू सावंत पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच हमाल पंचायतीचे अध्यक्ष एडवोकेट राहुल सावंत सहित सावंत गटाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा