*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिराढोण ता.कळंब जि.धाराशिव येथील ग्रामपंचायत प्रांगणात शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या मेळाव्यास परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक पद्धती, शासकीय योजना, खत-बियाणे व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या व उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार शेती कशी करावी, उत्पादन कसे वाढवावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मान्यवर पाहुण्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करत “शेतकरी हा देशाचा कणा आहे” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमादरम्यान शेतकरी बांधवांनी आपल्या अडचणी मांडल्या असून त्यावर सकारात्मक चर्चा झाली.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत व आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या मेळाव्यामुळे शेतकऱ्यांना नवी दिशा व नवा आत्मविश्वास मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सोपान अकेले गटविकास अधिकारी कळंब श्री नागेश पाटील कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव श्री भागवत सरडे तालुका कृषी अधिकारी कळंब श्रीमती श्वेता गिरी जिल्हा कृषी अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती मनीषा सुकाळे श्रीमती पीपी लोमटे नियंत्रक गुण अधिकारी कळंब श्री अलंकार बनसोडे आदी यावेळी प्रगतिशील शेतकरी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव माकोडे किरण पाटील संजय दादा शेळके तंटामुक्त अध्यक्ष अमोल नाईकवाडे ग्राम विकास अधिकारी करपे साहेब माजी उपसरपंच अयुब भाई कुरेशी सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे उपसरपंच अमोल माकोडे भैरवनाथ माकोडे पत्रकार रंजीत गवळी ताजखा पठाण राजपाल देशमुख वरून पाटील ग्रामपंचायत लिपिक मुन्ना यादव आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा