अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 9270442511*
दिनांक 18 जानेवारी 2025 वार रविवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि गुरुवारी 15 जानेवारी 2025 रोजी शेवगांव तहसील कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. माया मुंढे यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष आणि तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली. परंतु सकाळी 11 ते 01 वाजेच्या दरम्यान खूप मोठा हाय होल्टेज ड्रामा उपस्थित नगरसेवक त्यांचे नातेवाईक समर्थक पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकारांनी पाहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितपवर गटाकडून सुरवातीला गटनेते निलेश रोकडे यांनी अर्ज भरला त्यानंतर काही वेळाने भा.ज.प.चे सागर फडके यांनी अर्ज भरला या घटनेमुळे राष्ट्रवादीच्या चार ते पाच नगरसेवकांनी सभागृह सोडले आणि आम्हाला फडके यांचि उमेदवारी मान्य नाही असा निरोप नेतृत्वाला दिला त्यानंतर काही मिनिटात भाजपचे गट नेते नितीन दहिवाळकर यांनी स्वतःचा फॉर्म उपनगराध्यक्ष पदासाठी भरला यामुळे भाजपच्या चार नगरसेवकांनी गटनेत्यांच्या हातातील व्हिप फाडत सभागृह सोडले त्या नंतर फॉर्म भरायला अवघे पाच मिनिटे बाकी असताना विद्यमान उपनगराध्यक्ष सिराजभाई पटेल यांचा फॉर्म भरला गेला त्या नंतर भाजपच्या गट नेत्यांनी सभागृहात घडलेला सर्व प्रकार त्यांच्या नेतृत्वाच्या कानावर घातला नेतृत्वाने त्यांनाही फॉर्म विड्रॉल करायला लावला त्यामुळे फक्त राष्ट्वादीचे दोन फॉर्म शिल्लक राहिले शिवसेनेचे नेते अरुण मुंढे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेतृत्वाशी चर्चा करून काही अटी आणि शर्तींसह सिराजभाई पटेल यांच्या नावाला संमती दिल्याने वरिष्ठांच्या आदेशाने निलेश रोकडे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि अनेक नाट्यमय घडामोडी नंतर शेवगांवला बिनविरोध उपनगराध्यक्ष मिळाला. [ नाराजी दुर करताना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वसन देऊनही संधी हुकलेले भा.ज.प.चे जेष्ठ नेते अशोक शेठ आहुजा पुन्हा अरुण मुंढे यांच्याशी जुळवून घेणार का ???
*ताजा कलम*
*या सर्व नाट्यमय घडामोडी घडत असताना अनेक सभ्य म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांनी सभागृहातील महिला नगरसेवक सदस्यांसमोर त्यांच्याच नेतृत्वाला आणि गट नेत्याला शिवराळ भाषा वापरली अनेकांचे रुसवे फुगवे काढताना प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाचा कस लागला जनतेने निवडुन दिलेल्या अरुण मुंढे याना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जंग जंग पछाडलेल्या अनेक दिगज्ज नेत्यांना आपला पैलवानी हिसका दाखवत दोन राष्ट्रवादी शिवसेना असा मोठा सत्ताधारी गट तयार करण्यात यश मिळविले*
*क्रमशः*
*आता आदळ आपट करून सभागृह सोडून गेलेले ते भाजप jचे चार नगरसेवक पुन्हा
पक्षाकडे वळणार ??? का सत्ताधारी शिवसेनेशी जुळवून घेणार ???
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा