*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
म्हैसगाव येथील विठ्ठल कारखाना विकल्यानंतर आदिनाथही विकला जावा यासाठी माजी आमदार संजयमामा यांनी देव पाण्यात ठेवले आहेत असा हल्लाबोल पाटील गटाकडून प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी नंतर आदिनाथ कारखाना विकला जाईल असे भाकीत माजी आमदार संजयमामा शिंदे हे वारंवार करत आहेत याचा पाटील गटाकडून आज चांगलाच समाचार घेण्यात आला. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की मुळात माजी आमदार संजयमामा शिंदे यांना हल्ली खराब स्वप्न पडत
असुन त्यांनी झोपण्याची दिशा बदलावी. श्री आदिनाथ कारखाना विकला जातो आहे असे स्वप्न त्यांना वारंवार पडू लागले आहे. मुळात माजी आमदार संजयमामा शिंदे हे स्वतःचा कारखाना चालवण्यास अपयशी ठरले आहेत. कुटूंबातील स्थावर मालमत्ता वाटणीत त्यांना म्हैसगाव येथील साखर कारखाना आयताच मिळाला होता. परंतु त्या कारखान्याचा ऊस गाळपासाठी उपयोग करण्या ऐवजी त्यांनी विविध बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कल्पना न देता शेतकऱ्यांचे नावे बोगस कर्ज काढून साखरे ऐवजी पैशाची गोणी भरण्यासाठी केला. शेवटी शेतकऱ्यांना या कर्जाबाबत जप्तीच्या नोटीसा येऊ लागल्याने त्यांनी तो कारखाना विकला. आता त्यांच्या मनाने इतका धसका घेतला आहे की अडणीतील प्रत्येक कारखाना हा विक्रीसच निघतो असा त्यांचा पक्का समज झालेला आहे. परंतु आदिनाथ बाबत असे होणार नाही. मुळात हा कारखाना कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांच्या त्यागातुन व शेतकऱ्यांच्या घाम गाळून दिलेल्या कष्टाच्या पैशातुन उभारलेला आहे. संजयमामांना कितीही दु: स्वप्न पडली तरी आदिनाथ बाबत त्यांचे स्वप्न खरे होणार नाही.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असे म्हणतात त्याप्रमाणे संजयमामा यांच्या वाईट भाकीतामुळे आदिनाथ काही विकला जाणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांना कसे फसवले, त्यांच्या कमलाई कारखान्याचे कारनामे व आमदार म्हणुन त्यांच्या मागील पाच वर्षातील भ्रष्टाचाराचे पुरावे असलेला पेनड्राईव आता प्रचार काळात माजी आमदार संजयमामा शिंदे यांना उघडे पाडणारच आहे. पण तुर्तास आदरणीय संजयमामा यांनी निदान झोपण्याची दिशा बदलून पश्चिमेस डोके करुन झोपावे असा चांगला सल्ला आम्ही पाटील गटाकडून त्यांना देतो आहे असे पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा