Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

*शिक्षणापासून आपल्या तालुक्यातील कोणी मुलगी वंचित राहू नये -मुख्याध्यापक--संभाजी जगताप सर.*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


साऊ जिजाऊ ,फातिमाबी जयंती आणि संक्रांतीचे हे शैक्षणिक वाण देऊन ओम महिला मंडळाने श्री गिरधरदास देवी विद्यालयातील इ सातवीत शिकणारी मुलगी कु.गिता वाघमोडे हिस इ.१० वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊन साऊजीजाऊंच्या विचाराचा वारसा जपला.असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुख्याध्यापक  संभाजी जगताप सरांनी व्यक्त केले.

 पुढे ते म्हणाले की आपल्या परिसरातील कोणी मुलगी परिस्थिती मुळे शिक्षणापासून वंचित राहू नये ही ओम महिला मंडळाची तळमळ मी गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आलो आहे.

      दरवर्षी अशा मुली शिक्षणासाठी दत्तक घेऊन एक सामाजिक जबाबदारी उचलणा-या या मंडळाचे कौतुक मा.नरतवडेकर सरांनी ही आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ वर्षा करंजकर, डॉ.कविता कांबळे, डॉ.अपर्णा भोसले यांची लाभली.

प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा साहित्यिका अंजली राठोड श्रीवास्तव यांनी केले.

विद्यार्थीनी कु.गिता वाघमोडे म्हणाली की मी अभ्यास करून प्रशालेचे नाव मोठे करेन.सदर मंडळाची मी आभारी आहे.

शिक्षिका मा.अनिता कांबळे म्हणाल्या की महिलांचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न किंवा नैसर्गिक संकटे असो ओम महिला मंडळ तत्परतेने हजर असते.

सुनिता यादव,अलका यादव,रेशमा जाधव व जयश्री लुणिया,मितवा अग्रवाल ,शहनाज मोमीन यांनी स्वागतगीत सादर केले.

  ज्योती पांढरे,उषा बलदोटा,पुष्पा लुंकड, सुवर्णा लुणिया,

लक्ष्मी कटारिया व पल्लवी निंबाळकर यांनी आगामी कार्यक्रमाची कल्पना देऊन मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन मा.गलांडे मॅडम यांनी केले.

जयश्री वीर यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा