*उपसंपादक --नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळीनगर गट नंबर २ येथील डॉ.अविनाश जाधव यांचे रुक्मिणी हॉस्पिटल येथे एच.व्ही.देसाई हॉस्पिटल महम्मदवाडी पुणे,रोटरी क्लब अकलूज व रुक्मिणी हॉस्पिटल,माळीनगर गट नंबर २ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत केले असल्याची माहिती अकलूज रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.केतन बोरावके यांनी दिल
या शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन, अकलूजचे अध्यक्ष डॉ. संजय सिद यांचे हस्ते व माळशिरस तालुका निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.अमोल माने-शेंडगे यांचे अध्यक्षतेखाली आणि माळशिरस तालुका होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजे-भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन गुरुवारी स. ९ वाजता होणार असल्याचे अकलूज रोटरी क्लबचे सचिव रो.अजिंक्य जाधव यांनी सांगितले.या शिबिरात एच.व्ही. देसाई नेत्र हॉस्पिटल पुणे यांच्या डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. नेत्र व मधुमेह तपासणी तसेच तज्ञ डॉक्टरांकडून त्याविषयी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. मोतीबिंदू पेशंटच्या शस्त्रक्रिया या एच.व्ही.देसाई नेत्र हॉस्पिटल सोलापूर येथे मोफत करण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर येथे पेशंटला नेण्यासाठी परत आणण्यासाठी बसची मोफत सोय केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या मोफत नेत्र तपासणी शिबिरातील रुग्णांना माफक दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. या शिबिरातील मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आधार कार्ड व रेशन कार्ड आवश्यक आहे.
तरी या मोफत नेत्र तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत मधुमेह तपासणी शिबिराचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रुक्मिणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश जाधव व या शिबिराचे प्रकल्प प्रमुख रो.कल्पेश पांढरे यांनी केले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा