Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

*ऑपरेशन परिवर्तन मोहीमे अंतर्गत सोलापूर तालुका, पोलीस ठाणेची कारवाई* *चोरून चालणा-या अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त*

 "*सोलापूर-- प्रतिनिधी*

  *आंबिद  बागवान*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


     16 हजार 800 हजार लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्ट

22 लिटर हातभट्टी दारू व 9 देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत

एकूण 8 लाख 85 हजार 820 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

   ऑपरेशन परिवर्तन मोहीमे अंतर्गत मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री.अतुल कुलकर्णी, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल देशपांडे यांनी दिनांक 13.01.2026 रोजी विशेष मोहीम राबवुन पोलीस ठाणे कडील अधिनस्त पोलीस अंमलदार यांचेसह सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील वडजी तांडा, शिवा तांडा बक्षीहिप्परगा येथे चोरून अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टया व एमआयडीसी पाकणी ता.उत्तर सोलापूर येथे हातभट्टी दारूची विक्री करणा-या विरूध्द छापा कारवाई केली आहे.  

  चोरून अवैधरित्या देशी दारूच्या हातभट्टयावर व दारू विक्री करणा-या याचे विरूध्द केलेल्या कारवाईत एकूण 8 लाख 85 हजार 820 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये 16 हजार 800 हजार लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू, प्लॅस्टीक व लोखंडी बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू, हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक व लोखंडी बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. 

 एम.आय.डी.सी. पाकणी ता.उत्तर सोलापूर येथे चोरून हातभट्टी दारूची व देशी दारूच्या बाटल्याची विक्री करणारे याचेकडुन एकूण 1820/-रूपये किंमतीचे 22 लिटर हातभट्टी दारू व 9 देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.

      चोरून अवैध दारूच्या हातभट्टया व दारूची विक्री करणा-या एकूण 5 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ व 65 ई अन्वये एकूण 5 गुन्हे दाखल केले आहेत.   

     यापुर्वी देखील सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणा-या अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून कारवाई करून संबंधीत इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 

      सदरची छापा कारवाई मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले श्रेपोउपनि/घोळवे, बागवान, सपोफौ/रामेश्वर कोडक, पोहवा/महेश कटकधोंड, पोकॉ/सागर ननवरे व विलास लोखंडे व मपोकॉ/दिपाली खोत यांनी बजावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा