संपादक-- टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
ट्रस्टने वाटप केलेले पैसे परत मिळणेबाबत. अब्बास अहमद शेख महर्षी नगर यशवंतनगर यांनी माननीय धर्मादाय आयुक्त धर्मादाय कार्यालय सोलापूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे की
उपरोक्त विषयान्वये आपणास तक्रारी अर्ज करतो की, मी नमुद राहणार वरील पत्त्यावरील असुन माझ्या गावातील संग्रामसिंह गणेश उत्सव बहुउद्देशिय संस्था महर्षी नगर ता -माळशिरस, जि - सोलापुर या संस्थेचे संस्थापक अशिष खराडे, संस्थेचे अध्यक्ष हासिम पठाण, उपाध्यक्ष - पांडुरंग शिंदे, सचिव अरुण देशमुख व इतर कार्यकारणी मंडळ यांनी सदर संस्था स्थापन करुन या संस्थेच्या नावाने गावातील व इतर खेड्यामधुन लोकवर्गणीतुन पैसे गोळा करुन सदर संस्थेच्या नावाने सन 2016 पासुन श्री. गणेश मुर्ती मंदिर स्थापन करण्यासाठी लोकवर्गणीतुन एकुण रक्कम रुपये 4,75,000/- पंचधातुची मुर्ती चेन्नई मधुन बनविली असुन ती मुर्ती अद्याप बसविलेली नाही, त्याठिकाणी लोकवर्गणीतुन दुसरी मुर्ती बसविण्यात आली आहे.
सदर मुर्तीसाठी दिलेली रक्कम त्याचा अद्याप हिशोब नाही. त्यानंतर दिनांक 30/05/2017 रोजी एकुण रक्कम रुपये 5,60,674/- वाटप केले. दिनांक 10/04/2017 रोजी रक्कम रुपये 8,23,229/- गणपती तिसरा 28/06/2017 रोजी एकुण रक्कम रुपये 4,42,149/-. गणपती 4 10/07/2017 रोजी एकुण रक्कम रुपये 70,706/- पाचवा गणपती दिनांक 15/06/2017 महिला वाटप यादी एकुण रक्कम रुपये 385787/- रुपये, याप्रमाणे सदर रकमेचा गैरव्यवहार असुन अद्याप या रकमचा हिशोब (ताळेबंद) लागला नाह
लिपीक 05/01/e सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सोलापूर विभाग, सोलापूर.
वरील प्रमाणे आशिष खराडे यांनी सदर रकमेचा गैरव्यवहार चौकशीअंती दिसुन आलेला आहे. तरी संबंधीतावर योग्य ती सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. जमा झालेली सर्व रक्कम गोळा करुन ती रक्कम ट्रस्टी च्या बँक खात्यावर जमा करावी. सदर अर्ज दिल्यापासुन सदर अर्जावर 15 दिवसात कार्यवाही करावी. तसे न झाल्यास मी संविधानिक मागनि अमरण उपोषण (अन्न त्याग) करणार आहे. सदर अर्ज दिल्यापासुन माझ्या जीवीतास काही धोका झाल्यास किंवा घातपात झाल्यास त्याची सर्वस्वी संग्रामसिंह गणेश उत्सव बहुउद्देशिय संस्था जबाबदार राहील. याची आपण दक्षता घ्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे
सदर ही प्रत कार्यवाहीस्तव पाठवण्यात आली आहे
मा. मुख्यमंत्री सो.
महाराष्ट्र राज्य मुंबई
मा. पालकमंत्री सो.
सोलापुर जिल्हा सोलापुर
मा. जिल्हाधिकारी सो.
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर
मा. पोलीस अधिक्षक सो.
पोलीस अधिक्षक कार्यालय सोलापुर
मा. राम सातपुते सो,
मा. आमदार माळशिरस विधानसभा






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा