Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ जानेवारी, २०२६

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व संक्रांतीचा सण लवंग मध्ये उत्साहात साजरा .

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



सामाजिक समतेचा आणि महिला सशक्तीकरणाचा दीपस्तंभ असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिलांसाठी सण किंवा उत्सवच आहे, अस्मिता लोकांचलित सधन केंद्र महाळूंग अंतर्गत  विश्वरत्न ग्रामसंघातील महिलांनी अत्यंत उत्साहात व वेगवेगळ्या उपक्रमांतून साजरी केली. पारंपरिक कार्यक्रमांऐवजी महिलांनी विविध मनोरंजक व एकात्मतेला चालना देणारे खेळ घेत जयंती व संक्रांतीच्या सणाला आनंदोत्सवाचे स्वरूप दिले



या कार्यक्रमात संगीत खुर्ची, चमचा लिंबू,अशा खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळांमधून महिलांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि एकमेकांशी सुसंवाद वाढताना दिसून आला. विजेत्या महिलांना प्रतीकात्मक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व, स्त्री स्वावलंबन आणि समाजपरिवर्तनात महिलांची भूमिका यावर उपस्थित महिलांनी मनोगत व्यक्त केले


“सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाच्या प्रकाशामुळे आज आम्ही आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत,” असे भावनिक उद्गार अनेक महिलांनी काढले.

हा उपक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता, महिलांमधील एकजूट, आनंद आणि सशक्तीकरणाचा उत्सव ठरला.विश्वरत्न ग्राम संघातील महिलानी सावित्रीबाई फुले जयंती व संक्रांत निमित्त हाळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला याप्रसंगी बचत गटातील सर्व महिला व ग्रामसंघाचे अध्यक्ष वसुधा टिक  खजिनदार  आशा पवार मॅडम ,मोहिनी प्रशांत पाटील ,फिनिक्स इंग्लिश स्कूल च्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख ,डॉक्टर प्रियंका अमोल माने,व्यसनमुक्ती केंद्र अध्यक्षा अमृता झाजुरने ,व्यवस्थापक संग्राम बनकर  महाळुंग गना चे सहयोगीनी सारिका  माने, रेश्मा मगर , लेखापाल  लवटे मॅडम  लेखापाल अमोल भोसले  लेखापाल लखन साठे  डॉ संतोष जावेद सर  सी आर पी. वैशाली कांबळे , सारीका  गायकवाड , अस्मिता कोकाटे, सोनम कोकाटे व ग्रामसंघातील महिला उपस्थितीत होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा मगर यांनी व  सारिका गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा