उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
तांबवे गावात सामाजिक एकोपा आणि धार्मिक सलोख्याचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले.गावातील मंदिर आणि मस्जिद मध्ये केवळ 15 ते 20 फुटांचे अंतर आहे .मंदिर आणि मस्जिद मध्ये ही आणि वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्येही धार्मिक अंतर दिसत नसून सर्व धर्म समभाव आणि एकात्मता गावात दिसून येते .गावातील मुस्लिम समाजाने पुढाकार घेत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून सर्वधर्म समभावाचा आदर्श घालून दिला.
या हरिनाम सप्ताहात गावातील सर्व समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या वातावरणात गावात भक्तीबरोबरच आपुलकीची भावना अधिक दृढ झाली. विशेष बाब म्हणजे मागच्या सोळा वर्षांपासून गावात हरिनाम सप्ताह चालू आहे.प्रत्येक वर्षी सप्ताहातील एका दिवशी मुस्लिम समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.यंदा पुणे राजगुरुनगर येथील झी मराठी फेम समाज प्रबोधनकार ह.भ.प वैभव गाढवे महाराज यांना कृषी अधिकारी ( बँक ऑफ इंडिया )फकृद्दिन शेख यांनी
रोख रक्कम व शाल श्रीफळ देवून सन्मानित केले तर अबूबक्कर महमद शेख सर व धर्मगुरू जनाब जीलानी शेख
यांनी स्पतहातील एक दिवसीय महाप्रसादाची संपूर्ण जवाबदारी उचलली . हिंदू–मुस्लिमसह सर्व समाजातील नागरिकांनी कोणताही भेदभाव न ठेवता सहभाग घेतला. प्रेम, माणुसकी आणि बंधुभावाच्या भावनेतून दिलेला हा महाप्रसाद सामाजिक ऐक्याचा जिवंत संदेश ठरला.
धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन तांबवे गावाने एकतेचा आणि शांततेचा आदर्श निर्माण केला असून, हा उपक्रम आजच्या काळात समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लतीब शेख,सतीश कोळेकर,माणिक कोळेकर,मोईन शेख ,असिफ अली शेख दशरथ लवटे,सलीम खान,अस्लम मुलाणी,एजाज शेख यांनी प्रयत्न केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा