*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा: अंधश्रद्धा म्हणजे विचार न करता स्वीकारलेला अंधविश्वास ,भीती, अज्ञान, परंपरेचा दबाव, किंवा एखाद्याचा प्रभाव, यांच्यामुळे तयार झालेली असमजूत आहे.त्यामुळे समाजात ज्या अघोरी अंधश्रद्धा आहेत, त्याला बळी न पडता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा ; असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सचिव अनिल माने यांनी केले. प्रतापसिंह मोहिते - पाटील महाविद्यालय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने मोरवड तालुका करमाळा येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिरात अंधश्रद्धा या विषयावर माने बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर हे होते. पुढे बोलताना माने म्हणाले की अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक असून ती माणसाला कुठल्याही संकटात आणू शकते. श्रद्धा ठेवा, पण विचार करून. शोधा, शंका घ्या, प्रश्न विचारा, आंधळेपणाने चालू नका. सजगपणे जगा असे आवाहन केले. यावेळी माने यांनी विविध चमत्काराचे प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांचे प्रबोधन केले. यावेळी अनिसचे कार्याध्यक्ष दिगंबर साळुंके, उपाध्यक्ष संजय हंडे, प्राचार्य प्रवीण देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. सोमनाथ जाधव प्रा. महादेव वाघमारे डॉ.अरुण चोपडे डॉ. स्वाती पाटील प्रा. राहुल भोंडवे,जयश्री माने - देशमुख प्रा.सुहास पोहरे, प्रा.संग्राम दयाळ,प्रा.श्रीकांत शिरसट प्रा.सुप्रिया जवळेकर,प्रा. सुरेश पालवे, नितीन घोडके यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास सरपंच रामहरी कुदळे, उपसरपंच अश्विनी दादासाहेब कुदळे, तात्यासाहेब काळे - पाटील, महेश काळे - पाटील, मुख्याध्यापक श्रीराम बिनवडे, सोमनाथ पाटील, ज्ञानदेव कांबळे ,गोरख कांबळे, नामदेव नाळे, हनुमंत दिवटे यांनी सहकार्य केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा