*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
राजेगाव ता. दौंड जि. पुणे येथे दत्तकला शिक्षण संस्थेमार्फत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अंतर्गत श्रमदान शिबिर दिनांक २० जानेवारी २०२६ पासून यशस्वीरित्या चालू आहे. आज शिबिराचा चौथा दिवस होता. या शिबिरास राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे विभागीय सन्मवयक डॉ. अनिल बनसोडे सर यांनी सदिच्छ भेट देत स्वयंसेवकांचे मनोबल वाढवले, तर सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. मीना कुलकर्णी यांनी 'महिला सक्षमीकरण' या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान दिल
या विशेष श्रमदान शिबिरात परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई तसेच सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले.
यावेळी डॉ. अनिल बनसोडे सरांनी युवकांनी समाजसेवेच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, सचिवा प्रा. मायाताई झोळ मॅडम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर यांच्या मार्गदर्शना अंतर्गत NSS कार्यक्रम अधिकारी, शिक्षकवृंद तसेच सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सेवाभाव आणि महिलांविषयी सन्मान व समानतेची जाणीव अधिक दृढ होत आहे. तसेच हा उपक्रम २६ जानेवारी २०२६ पर्यंत चालू राहणार आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा