उपसंपादक- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
दि.सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळा क्रमांक ३,माळीनगर,गट नंबर २ येथे कांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी
वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.डॉ. संजय घोंगाणे यांनी भूषविले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नागटिळक मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.मुकुंद मुंडफणे, पालक श्री.विशाल चव्हाण आणि डॉक्टर संजय घोंगाणे यांनी प्रतिमेचे पुजन केले.
१५ ते १६ विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर
सुंदर आणि अर्थपूर्ण शब्दात आपले विचार मांडले.शिक्षणाशिवाय पर्याय नाही तोच खरा बदलाचा मार्ग आहे हे विचार कवियत्री नूरजहाँ शेख यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.काळे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.खरात सर यांनी केले.
जयंती निमित्ताने विविध स्पधांचे करण्यात आले होते. त्याचे बक्षीस वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम.बंडगर मॅडम,श्रीम.म्हेत्रे मॅडम, सौ. देवकाते मॅडम, सौ. शिंदे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा