Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

*अकलूज येथील लोकायत लोकसंचालित साधन केंद्रात* *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

 *अकलूज प्रतिनिधी*

*एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


*महिला आर्थिक विकास महामंडळ* जिल्हा कार्यालय सोलापूर *महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान* अंतर्गत *लोकायत लोकसंचलित साधन केंद्र* अकलूज या संस्थेत क्रांतीज्योती ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉक्टर कश्मिरा लोहकरे मॅडम व लोकायत लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष प्रतिभा गायकवाड मॅडम तसेच सचिव संगीता गडदे मॅडम तसेच सर्व लोकायत लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत या कार्यकारणी व CRP,क्षेत्र समन्वयक, लेखापाल,व व्यवस्थापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते... कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मध्ये प्रतिमेची पूजा करण्यात आली.     



 त्यानंतर प्रार्थना इतनी शक्ती हमे देना दाता ही घेण्यात आली त्याचबरोबर लोकायत लोकसंचालित साधन केंद्राच्या  अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले...कार्यकारणी जयमाला सगर यांनी क्रांतीज्योती सावित्री माते विषयी मनोगत व्यक्त केले तसेच संगीता गडदे मॅडम यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माते विषयी मनोगत व्यक्त केले.. Clf व्यवस्थापक कामिनी ताटे देशमुख यांनी सावित्रीबाई फुले याचा इतिहास सांगितला.. त्यानंतर महिलांचे आरोग्य याविषयी डॉक्टर कश्मीरा मॅडम यांनी हेल्थ,स्किन, हॆअर  याविषयी उपस्थित सर्वांना माहिती दिली.... कार्य कार्यक्रमांमध्ये बालविवाह रोखण्याबाबत उपस्थित सर्व प्रार्थना ( शपथ) घेतली...

          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा