*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
धाराशिव (उस्मानाबाद) — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) धाराशिव जिल्ह्यात संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, खलिफा भाई कुरेशी यांची जिल्हा गटनेता पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पक्षात नवचैतन्य संचारले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
खलिफा भाई कुरेशी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि पक्षनिष्ठ कार्यासाठी ओळखले जातात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे, तसेच तरुणांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यशैलीचा लाभ पक्षवाढीस निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी खलिफा भाई कुरेशी यांचे अभिनंदन केले असून, धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अधिक मजबूत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट लोकप्रिय जिल्हाध्यक्ष प्रताप सिंह पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नेते मसूद भाई शेख विशाल शिंगाडे नगरसेवक बबलू आयाज शेख शेखर घोडके तुषार वाघमारे इरफान भाई कुरैशी रणवीर इंगळे रोहित बागल सरफराज कुरेशी सईद काजी घोगरे सर आदी पदाधिकारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा