*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
विकासकामात टक्केवारी घेणारे संजयमामा आता मतांची टक्केवारी सांगुन आपलं राजकीय अस्तित्व टिकवू पाहत आहेत असा हल्लाबोल पाटील गटाकडून करण्यात आला. काल माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाचा मेळावा करमाळा येथे पार पडला. यात त्यांनी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर टिका केली. या टिकेस आज पाटील गटाकडून प्रत्युत्तर दिले गेले. यावेळी सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केवळ विधानसभा निवडणुक नजरेसमोर ठेऊन दहिगाव उपसा सिंचन योजना बंदिस्त पाईप लाईन व करमाळा तहसिल कार्यालय स्थलांतर हि दोन कामे मंजुर करुन घेतली. यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईप लाईन कामाची निवीदा निघाली आणि काही ठिकाणी कामे सुरु झाली. सदर काम हे जरी एका नवख्या व मतदार संघाबाहेरील ठेकेदाराने घेतले असले तरी त्या ठेकेदाराच्या अंतर्गत सब कॉन्ट्रॅक्टर म्हणुन माढा तालुक्यातील एक ठेकेदार काम करत आहे. त्याचे नाव जाहीर झाल्यास माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या अडचणीत आणखी वाढ होईल. यामुळे मग विकासकामात टक्केवारी घेऊन त्यातुन विधानसभा निवडणुकीसाठी पैसा प्राप्त करायचे काम तर केले गेले. परंतु मतदारांनी शिंदे यांचा हा डाव हाणुन पाडला आहे.
तीस वर्षाच्या राजकिय कारकिर्दीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसुन माजी आमदार संजयमामा शिंदे हे नारायण आबांची स्वच्छ प्रतिमा मलिन करण्यासाठीच असे खोटी वक्तव्ये करत आहेत. सध्या माजी आमदार संजयमामा शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे व त्याने निवडणुकीस उभे रहावे यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण मोठ्या ऑफर देऊनही अनेक कार्यकर्ते हे निवडणुकीस उभे राहण्यास नकार देत आहेत. पराभव समोर दिसत असल्याने पैशापेक्षा प्रतिष्ठेला महत्व देऊन हे कार्यकर्ते चक्क माजी आमदार संजयमामा यांची मोठी ऑफर नाकारत असल्याची माहिती सोगाव येथे शिंदे गटाच्या उमेदवार चाचपणी बैठकीतुन बाहेर आली आहे.
या बैठकीत तोंडाला निळा मफलर गुंडाळून बसलेल्या शिंदे गटाच्याच एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या कार्यकर्त्याजवळ बोलून दाखवली आहे असा गौप्यस्फोट तळेकर यांनी केला. तर माजी आमदार संजयमामा शिंदे हे स्वतः हुन करमाळा तालुका सोडतील. त्यांना बाहेर काढण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व गटाने एकत्र येण्याची कदापिही गरज भासणार नाही. आपल्या निष्क्रियतेला सहानुभूतीची झालर लावण्यासाठी संजयमामा हे आपल्याला एकाकी टाकल्याचे बोलून दाखवत आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे हे पुढील विधानसभा निवडणुकीत उभे असतील तर आमदार नारायण आबा पाटील यांना २०२९ मध्ये आमदार पदाची हॅट्रीक करण्यास आणखी सोपे जाणार असल्याचे सांगुन माजी आमदार संजयमामा शिंदे हे विधानसभा, आदिनाथ व आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत पदरी हार घेऊन पराभवाची हॅट्रीक पुर्ण करतील असा दावा सुनील तळेकर यांनी केला आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा