*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिराढोण गावाच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने झटणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे सैलानी भाई सेठ बागवान आज गावात एक विश्वासाचं नाव बनलं आहे. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या सैलानी भाईंनी गावासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे ते जनतेच्या मनात घर करून आहेत.
गावातील स्वच्छतेसाठी घंटागाडीची सुविधा सुरू करून त्यांनी “स्वच्छ गाव – सुंदर गाव” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवलं. त्याचबरोबर गरजू घटकांसाठी विविध सामाजिक योजना, मदतीचे उपक्रम, आणि विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग कायमच उल्लेखनीय राहिला आहे.
याच भक्कम कार्याच्या जोरावर जिल्हा परिषदेसाठी सैलानी भाई सेठ बागवान यांची उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांना तगडा उमेदवार मानलं जात आहे. “शिराढोणचा विकास अजून जोमाने करायचा” हा त्यांचा निर्धार असून, पुढील काळात पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा त्यांचा मानस आहे.
सामान्य जनतेशी थेट नाळ जोडलेला, कामातून बोलणारा नेता म्हणून सैलानी भाई सेठ बागवान यांच्याकरडे शिराढोणकर आशेने पाहत आहेत. विकास, विश्वास आणि प्रामाणिकपणाचा हा प्रवास जिल्हा परिषदेत नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा