Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

*राज्यभर बोगस पत्रकारांमुळे खरी पत्रकारिता संकटात* *निर्भीड, पत्रकारांची काळाला गरज*

 *पत्रकार -यशवंत भुसारे*

*लोहारा जि. धाराशिव*



६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री साजऱ्या जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या झालेल्या मराठी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील अनेक सुज्ञ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार व वाचक वर्गाकडून चांगल्या पत्रकारांचे गुणगान तर बोगस पत्रकारां विरोधात तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. पत्रकारिता ही सेवा आहे, जात-पात, धर्म, पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन सत्य मांडणारी असावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकार कसा असावा, याबाबत बोलताना अनेकांनी स्पष्ट मत मांडले 




                 *:-----पत्रकार यशवंत भुसारे लोहारा:---*

   की पत्रकाराला ना जात असावी, ना पात; सर्व धर्मसमभावातून समाजहित जपणारी पत्रकारिताच खरी पत्रकारिता होय. मात्र सध्या काही ठिकाणी याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हाभर आज अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांची स्तुतीगायन करणारे, वास्तवाऐवजी स्वार्थासाठी बातम्या लिहिणारे तथाकथित पत्रकार समाजात वावरताना दिसत आहेत. बातमीपेक्षा सत्काराला अधिक महत्त्व देणारी, लेखणीपेक्षा बोलण्यावर भर देणारी प्रवृत्ती पत्रकारितेच्या




मूल्यांनाच तडा देत आहे. फक्त गळ्यात आयकार्ड अडकवून शासकीय कार्यालयात वावरणे, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, काम न झाल्यास बदनामीची धमकी देणे, ही कोणत्याही अर्थाने पत्रकारिता नाही, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी मांडली. लेखणी जास्त असणारे बोगस पत्रकार ही खरी पत्रकारितेची मोठी शोकांतिका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अशा बोगस पत्रकारांच्या कारभारामुळे प्रामाणिक, निर्भीड आणि वस्तुनिष्ठ बातम्या लिहिणाऱ्या खऱ्या पत्रकारांची समाजात मानहानी होत आहे. परिणामी

जनतेचा पत्रकारितेवरील विश्वास डळमळीत होत चालला आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. टू कॉपीवर पत्रकार असल्याचा आव आणणाऱ्या अशा बोगस प्रवृत्तींवर तात्काळ आळा बसावा, पत्रकारांची नोंदणी, ओळख आणि आचारसंहिता काटेकोरपणे राबवली जावी, अशी मागणीही यावेळी अनेक नागरिकांतून करण्यात आली. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दाखवून दिलेल्या सत्य, निर्भीडता आणि समाजप्रबोधनाच्या वाटेवरूनच पत्रकारितेने चालावे, अन्यथा पत्रकार दिन साजरा करण्यालाच अर्थ उरणार नाही, अनेक पत्रकार नुसता आयकार्डाचा गैरवापर करीत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा