*कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*
*बिलाल कुरेशी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पिंपळगाव (ता. भूम) — ग्रामीण राजकारणात महिलांच्या नेतृत्वाचा ठसा उमटवत पिंपळगावच्या तीन टर्म सरपंच, तसेच महिला सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या झीनत कोहिनूर सय्यद यांनी आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे.
सामान्य कुटुंबातून पुढे येत, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या झीनत सय्यद यांनी आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला बचतगट, शिक्षण व आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत भरीव काम करून दाखवले. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगावने विकासाचा नवा चेहरा पाहिला.
महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय राहिले आहे. महिला सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरातील महिला प्रतिनिधींना एकत्र आणत, त्यांच्या हक्कांचा बुलंद आवाज निर्माण केला.
“महिला सक्षमीकरण हेच खरे राष्ट्रनिर्माण” या विचारावर ठाम असलेल्या झीनत कोहिनूर सय्यद आता जिल्हा परिषदेतून व्यापक स्तरावर काम करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहिले जात आहे.
तीन टर्म सरपंच ते जिल्हा परिषद उमेदवारीपर्यंतचा हा थक असा प्रवास नक्कीच अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. ✨




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा