Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ जानेवारी, २०२६

*आज ट्रेडिंग कंपनी, चार शाखांचा विस्तार* *शिराढोण भूमिपुत्र जिलानी भाई* *कुरैशी यांचा कष्टातून उभा केलेला साम्राज्य*

 *कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*

   *बिलाल कुरेशी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



कष्ट, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर शून्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिराढोणचे भूमिपुत्र जिलानी भाई कुरेशी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

लहानशा सुरुवातीपासून सुरू झालेले राजकमल चिकन सेंटर आज केवळ चिकन विक्रीपुरते मर्यादित न राहता एक सक्षम ट्रेडिंग कंपनी म्हणून नावारूपास आले आहे. गुणवत्तेवर विश्वास, ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते आणि वेळेचे काटेकोर नियोजन या त्रिसूत्रीमुळे राजकमल चिकन सेंटरने अल्पावधीतच यशाची मोठी झेप घेतली आहे.

सध्या चार शाखांमधून यशस्वीपणे व्यवसाय सुरू असून, अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही जिलानी भाई कुरेशी करत आहेत. स्वतःचा व्यवसाय, स्वतःची ओळख या संकल्पनेला त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे.

राजकमल चिकन सेंटरची ही वाटचाल म्हणजे —

मेहनतीचे चीज होते याचा जिवंत दाखला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा