*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
पंचायत समिती निवडणुक ही तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करण्याचे माध्यम असून समाजाची जाण असलेल्या कार्यकर्त्यानाच संधी दिली जाईल,अशी स्पष्टोक्ती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. गौंडरे ता.करमाळा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. गौंडरे ता.करमाळा येथे आमदार पाटील गटाच्या हिसरे पंचायत समितीच्या गणातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब अंबारे हे होते. तर यावेळी व्यासपीठावर आमदार नारायण आबा पाटील, आदिनाथ कारखान्याचे संचालक आबासाहेब अंबारे, संचालक रविकिरण फुके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य चंदुनाना अंबारे, सौंदे येथील सरपंच मेजर लावंड, दत्तात्रय जगदाळे, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष नीळ सर, डॉ समाधान कोळेकर, उमेश सरडे (करंजे), बप्पा आतकरे (कोळगाव), डॉ नेटके, पत्रकार योगेश खंडागळे, शेलगाव (क) येथील सरपंच आत्माराम वीर आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की पाटील गटाकडे चांगल्या कार्यकर्त्यांची कमतरता नाही. प्रत्येक गणातुन व गटातुन निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असुन मोठ्या प्रमाणावर जनता ज्याची शिफारस करेल तो उमेदवार निवडला जाईल. माझ्यासाठी ग्रामपंचायतीचा सदस्य सुध्दा तितकाच मोलाचा आहे जितका की जिल्हा परिषद सदस्य होय. समाजासाठी झटण्यास पुर्ण वेळ देणारे कार्यकर्ते मला हवेत. पंचायत समितीच्या पदावर राहून मी सुद्धा एकेकाळी काम केले आहे.
यामुळे पाटील गटाकडून सर्व जातीच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची समान संधी दिली जाईल. या गणातील गावासाठी महत्वाच्या असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजना व सीना कोळगाव उपसा सिंचन योजना पुर्ण क्षमतेने चालू राहतील. सीना कोळगाव उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामांची पुर्तता व्हावी म्हणुन तृतीय सुप्रमा दाखल केली आहे. येत्या अर्थसंकल्पात यास मंजूरी मिळेल.या भागात पुर्ण दाबाने वीज मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असुन गौंडरे ता करमाळा येथे २२० केव्हीए क्षमतेचे वीज केंद्र निर्माण करण्यासाठी आपण प्रस्ताव दाखल केला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी केला. प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी केले तर यावेळी सोमनाथ लोहार, मेजर लावंड, आबासाहेब अंबारे, आदिनी विचार मांडले. उपस्थितांचे आभार उपसरपंच तानाजी नीळ यांनी मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा