Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

*राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विजय राठोड व विवेक यादव यांचा सत्कार.

 *कळंब -धाराशिव--प्रतिनिधी*

   *बिलाल कुरेशी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


धाराशिव :- शहरातील पुरातत्व वास्तुचे जतन व्हावे या उद्देशाने विजय राठोड व विवेक यादव यांनी धाराशिव लेणीच्या भिंतीवरील कोरलेली नावे पुसुन भिंती व परिसर स्वच्छ केला,छत्रपती शाहु महाराज स्मारक परिसर,जिजामाता उद्यानितील देखील परिसर स्वच्छ करुन तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला,याबाबत शिव फुले शाहू आंबेडकरी विचार धारेतुन जिजाऊंच्या लेकी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दोघांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा देऊन करण्यात आला.राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत लहान मुलींनी सहभाग घेतला होता, सत्कार करताना जिजाऊंच्या लेकी आशाताई कांबळे,अर्चना अंबुरे,अस्मिता पानसरे,मिरा मोटे,संस्कृती,पर्यटन जनजागृती संस्थेचे सहसचिव अब्दुल लतीफ, पर्यटन जनजागृती संस्था व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे, रौफ शेख,दिलीप देशमुख,मुकेश मोटे,श्रीकांत मटकिवाले,स्वराज जानराव सह इतर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा