*सहसंपादक -डॉ. संदेश शहा (इंदापूर)*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9922 419 159*
महिला शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील दुर्बल घटकांपर्यंत शिक्षणाच्या माध्यमातून पोहोचवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर शहरानजीक
सरडेवाडी येथे असलेल्या चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रा. प्राजक्ता झगडे, प्रा. गीतांजली कांबळे, आरती करांडे, आरती लोंढे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी समता, समानता व शिक्षण ही मूल्ये स्वीकारुन समाज जडणघडणीत योगदान देणे गरजेचे आहे. संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, कोषाध्यक्ष सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थी पृथ्वीराज गरगडे व ऋतुजा देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन
आरती लोंढे यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा