*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
तालुक्याच्या चारही बाजुचे साखर कारखाने चालु आहेत मात्र आपले आदिनाथ आणि मकाई हे दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद आहेत.. शेतकरी सभासद, कामगार देशोधडीला लागले..तरीही काही जणांना फक्त राजकारणच सुचते कसे? बेताल वक्तव्ये करून मनोरंजन करणाऱ्या पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी कारखान्या विषयी बोलावे!-असा इशारा माजी आमदार संजय मामा शिंदे गटाचे कट्टर समर्थक ॲड. अजित विघ्ने* प्रवक्ते.राष्ट्रवादी काँग्रेस. यांनी सत्ताधारी पाटील गटाला दिला आहे*
करमाळा तालुक्यातील निवडणुका लागल्या की आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालु होतात. विशेषतः नुकत्याच झालेल्या करमाळा नगरपरिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद/ पंचायत समिती करिता आचारसंहीता लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी सहा जिल्हा परिषद गटात व बारा पंचायत समिती गणात आढावा बैठका घेत कार्यकर्त्यांची मते जाणुन घेत ऊर्जा वाढवली आहे. यावरून आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी खांबेवाडी येथील कार्यक्रमात माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेवर टिका करत विकासकामांबातआरोप केले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर सर यांना कायमच निवडणुका लागल्या की अशी बेताल वक्तव्ये करण्याची सवयच आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच राहतात.वस्तुतः मा.आ.संजयमामा शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासुनच करमाळा तालुक्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे.यामुळेच शिंदे गटाचा आजपर्यंतचा प्रवास पाहता माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा मताचा टक्का वाढतच राहीलेला दिसुन येतो.माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेल्या विकासकामाबाबत आत लोक बोलु लागले आहेत आणि कामे प्रत्यक्षात दिसत आहेत. मात्र निवडणुका जिंकुनही करमाळा तालुक्यासाठी रुपयाचाही निधी आमदारांना आणता आला नाही त्यातच आदिनाथ कारखान्याची निवडणुक जिंकुनही शेतकरी सभासंदांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करू शकलेले नाहीत. ही खरी वस्तुस्थिती लपविण्यासाठीच तळेकर माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेवर टिका करत आहेत. प्रवक्ते तळेकर पेन ड्राईव्ह,धमाका, अणुबॉम्ब असे शब्दप्रयोग करून लोकांचे कायमच मनोरंजन करतात. माजी आमदार संजयमामांची पराभवाची हॅट्रीक होईल असे भाकीत करणाऱ्या प्रवक्ते तळेकरांनी आमदार नारायण आबा पाटील आमदार होण्याआधी किती निवडणुकात पराभुत झाले होते..आणि 2014 च्या आमदारकी नंतरही 2019 ला पराभुत झाले होते याचेही परिक्षण करावे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सक्षम नेतृत्व करमाळा तालुक्यातील प्रमुख पुढारी मंडळींना खटकते त्यामुळेच विधानसभा, आदिनाथ कारखान्यात अभद्र युती करून निवडणुका जिंकलेल्या आहेत याचाही अभ्यास करावा.. तीन चार गट एकत्र येऊन सुद्धा माजी आमदार संजयमामा शिंदे यांना 43 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे मतदारांची खरी पसंती कोणाला आहे हे पण सिद्ध झाले आहे. करमाळा तालुक्यातील राजकारणात महत्वाच्या नगरपरिषद निवडणुकीत पाटील गटाने नेमके कुणाचे काम केले याचा पेन ड्राईव्ह हळू हळू समोर येणारच आहे. सावंत गटानी करमाळ्यात नगरपरिषदेत केलेली एण्ट्री भविष्यकाळात तालुक्यात आणखी एका नवीन गटाची नांदी आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकातुन करमाळ्याचे राजकारण वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसेल. आगामी जिल्हा परिषद/ पंचायत समिती निवडणुकात मागिल झालेले पराभव नक्कीच भरून काढण्यासाठी आमचे सर्व नेते व कार्यकर्त सज्ज असुन, अनेक नवीन नेते व कार्यकर्त्यांचे प्रवेश लवकरच माजी आमदार. संजयमामा शिंदे गटात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकात आमच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे असे ठाम मत व्यक्त केले आहे. याशिवाय पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी विकासकामांचा आणि आदिनाथ कारखाना कसा चालु करणार याबाबतचा पेन ड्राइव्ह खिशात ठेवावा उगीच जनतेची शेतकरी सभासदांची दिशाभुल करु नये. तुमच्या प्रत्येकच गोष्टीला भुलणारी ही करमाळ्याची जनता नाही तुम्हाला निवडणुकात पास करणारी जनता आता रिझल्ट मागत आहे.तो रिझल्ट प्रवक्ते तळेकर सरांनी लवकर देणे बाबत कार्यवाही करावी. नाहीतर आगामी निवडणुकातील रिझल्ट पहायला सज्ज रहावे असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा