अकलुज प्रतिनिधी
एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
श्री गणेश विद्यालय पिंपळनेर ( ता. माढा) येथे कृषी शाखेतील विद्यार्थ्यांनी ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, कविता व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भारतीय संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये यावर विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे आपले विचार मांडले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या सर्वांगीण विकासात युवकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
---: जाहिरात:---👇
या कार्यक्रमास शाळा व विद्यालयाचे प्राचार्य, कृषी विभागाचे शिक्षक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये कषिदुत पारडे महेश, पाखरे नयन, नरसाळे सुजल, पराडे शिवराज आणि गोडे ज्ञानेश्वर यांचा समावेश असन ते शेतकन्यांना विविध विषयावर मार्गदर्शन तसेच आधूनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी व संविधानाविषयी जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘वंदे मातरम्’ व राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा