*सहसंपादक -डॉ. संदेश शहा (इंदापूर)*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9922 419 159*
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत शाळा व विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळा गलांडवाडी नं १ येथील उपशिक्षिका श्रीमती पौर्णिमा रणपिसे सावंत यांच्या प्रयत्नातून श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथील सन २००० सालच्या त्यांच्या दहावीच्या वर्गाकडून जि.प.शाळा गलांडवाडी नं.१ या शाळेस अँड्रॉइड टीव्ही संच भेट देण्यात आला. यावेळी या दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनी असणाऱ्या व इंदापूर येथील राजमाता ग्रुपच्या अध्यक्षा सौ. मयुरा ठोंबरे पाटील तसेच सौ. विद्या सातपुते मॅडम, सौ. वैशाली माने मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सातव सर, उपशिक्षक सुहास मोरे सर व सौ. मनिषा मोरे मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेत बालिका दिनानिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे तसेच इतर कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्यावत करण्यासाठी अँड्रॉइड टीव्हीचे अध्यापनात असणारे महत्त्व समजावून सांगत शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती पौर्णिमा रणपिसे सावंत यांनी टीव्ही संच दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार मानले व ऋण व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी याच गावच्या मूळ रहिवासी असणाऱ्या मा. डॉ. सौ वनिता भोईटे करपे यांनीही विद्यार्थ्यांचे आहार व स्वच्छता याबाबत समुपदेशन करत मुलींचे शिक्षणातील महत्त्व स्वतःच्या विचारातून विशद केले. त्यांनीही त्यांचे वडिल कै. बाबासाहेब कृष्णाजी भोईटे यांच्या स्मरणार्थ शाळेस एक व्हाईट बोर्ड भेट म्हणून दिला. इथून पुढच्या काळातही शाळेच्या विकासास आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी हातभार लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथील दहावीच्या बॅच कडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आले. शाळेच्या उपशिक्षिका सौ. मनीषा मोरे मॅडम यांनी सर्व देणगीदारांचे व उपस्थितांचे शाळेच्या वतीने आभार मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा