Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ४ जानेवारी, २०२६

करमाळा पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना निवासी इमारत बांधली जावी,,,,,,, आमदार पाटील यांनी दिले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

 *करमाळा-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी व करमाळा पोलीस ठाण्या अंतर्गत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना निवासी इमारत बांधली जावी, अशी मागणी करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे. मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आमदार नारायण आबा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत एक निवेदनही सादर केले आहे. अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की करमाळा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी व करमाळा पोलीस ठाणे या दोन्ही कार्यालयामध्ये उच्च पदस्थ १० कर्मचारी व ११० पोलीस शिपाई कर्मचारी कार्यरत आहेत. करमाळा तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असून करमाळा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये ११८ गावाचा समावेश आहे. सद्यस्थितीत पोलीस खात्याच्या मालकीच्या जागेत पोलीस कर्मचारी यांचेकरिता सर्वे नं. ३९२८ मध्ये ब्रिटीश कालीन २३ निवासस्थाने बांधण्यात आलेली होती. सदर निवास स्थानाच्या इमारती ह्या ७० ते ८० वर्षापूर्वीच्या असल्याने त्या धोकादायक, जीर्ण व मोडकळीस आलेल्या आहेत. संदर्भिय पत्रान्वये मा. उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा यांनी पोलीस निवासस्थानाचे संरचनात्मक तपासणी केलेली असून ते वापरण्यास योग्य नसल्याने कळविण्यात आलेले आहे. तसेच सदर इमारतीचे Structural Audit Report मध्ये निवासस्थानके निष्कशीत करणेबाबत सुचविले आहे. परंतु अद्यापही काही पोलीस कर्मचारी उक्त धोकादायक निवास स्थानकांमध्ये रहिवास करीत आहेत.करमाळा तालुक्यात चार साखर कारखाने, अपघाताचे व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय असल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर कामाचा शारीरीक व मानसिक ताण आहे. तसेच करमाळा तालुक्याबाहेरील पोलीस महिला व पुरुष कर्मचाऱ्याची संख्या मोठी असल्याने त्यांची निवासास इमारत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे संबधित सार्वजनिक बांधकाम विभागास ७० पोलीस कर्मचाऱ्यांच्या करीता नवीन अद्ययावत निवासी इमारत (वसाहत) बांधण्यासाठी अंदाजपत्रके सादर करण्याचे निर्देश द्यावेत.तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना निवासी इमारत बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा