*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आवाटी तालुका करमाळा येथे झालेल्या मारहाणीच्या तक्रारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बॅंच कोल्हापूरने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून त्यातील सात आरोपींना दिलासा मिळाला आहे तर एकास यापुर्वीच बाल न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सदरचे प्रकरण 23 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आवाटी ते परांडा रस्त्यावर घडल्या बाबत तक्रार देण्यात आली होती.
तेव्हापासून संशयित सर्व फरार होते. त्यांनी कोल्हापूर येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला यावेळी इमरान खान यासह सात जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. सदर प्रकरणाचे विधिज्ञ ॲड. सचिन देवकर व ॲड. आलिम पठाण, ॲड. विशाल घोलप यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहीती अशी की, सरपंच परविन खान यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाले नंतर त्यांच्यावर Whats app वर टिप्पणी केल्यानंतर जाब विचारायला आलेल्या गावातील सात ते आठ जणांनी तलवार, लाकडी काठीने डोक्यात उजव्या हाताच्या दंडावर पाठीत मारून जखमी करून मोटरसायकलचे नुकसान केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शहाबुद्दीन उर्फ फिरोज जहागिरदार यांनी फिर्याद दिली होती. यावेळी तपासात वैद्यकीय प्रमाणपत्राच्या पडताळणीवरून प्रकरणातील संशयीतांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा