*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सोशल मीडिया वर सोडलेली पोस्ट सध्या तालुक्यातील युवकांकडून चांगलीच व्हायरल होत आहे. जेऊरचे सरपंच तथा आमदार नारायण आबा पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांच्या राजकीय एन्ट्री बाबतची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट कोणते संकेत देते याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ती पोस्ट खालील प्रमाणे
युवक मित्रांनो,
तुम्ही भैय्यासाहेब यांनी तालूकापातळी वरील राजकारणात आता सक्रीय व्हावं असं बोलून दाखवलं... कदाचित न बोलताही अनेकजण यास सहमत असणारच आहेत..पण या सगळ्या राजकीय गणितावर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत... कदाचित ते उमेदवार असतील किंवा नसतील सुध्दा...पण
Wait and Watch.....
मित्रांनो....
करमाळा तालूक्याचे युवा नेते व भविष्यातील आमदार पृथ्वीराज पाटील अर्थात भैय्यासाहेब हे राजकारणाकडे केवळ सत्तेचे माध्यम म्हणून नाही, तर सेवेचे साधन म्हणून पाहतात. जनतेचा विश्वास, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांची जबाबदारी ही भैय्यासाहेब यांचेसाठी कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे.
प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारी विकासाची भावना निर्माण करणे हेच भैय्यासाहेब यांचे ध्येय आहे.
खरं तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, संधी आणि सन्मान पोहोचावा, यासाठी काम करणे हीच खरी लोकसेवा आहे. महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचे हक्क, युवकांचे भविष्य आणि सर्वसामान्यांचे प्रश्न — या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. आणि याचे महत्त्व भैय्यासाहेब जाणून आहेत. भैय्यासाहेब हे नेहमीच स्पष्टपणे मानतात की नेतृत्व म्हणजे कुठल्या तरी पदावरबसणे नाही, तर लोकांसोबत उभे राहणे होय. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांचा आवाज बनणे आणि त्यांच्यासाठी योग्य निर्णय घेणे हीच माझी भूमिका आहे. ही वाटचाल एकट्याची नाही — ही जनतेसोबतची आहे. आणि जोपर्यंत जनतेचा विश्वास सोबत आहे, तोपर्यंत ही सेवा, ही लढाई आणि ही सकारात्मक बांधिलकी अखंड सुरू राहील.
जनहित, जनसेवा आणि जनविश्वास — हाच भैय्यासाहेब यांच्या राजकारणाचा मार्ग आहे. आणि म्हणूनच तर अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या जनतेच्या मदतीला जीवाची पर्वा न करता भैय्यासाहेब धाऊन आले. करमाळा तालुक्यातील जनता भैय्यासाहेब यांचे हे योगदान विसरु शकणार नाही. कदाचित भविष्यात मतरुपी आशीर्वाद देऊन हिच जनता युवकांचे आयकॉन असलेल्या भैय्यासाहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील.
कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांचा हा नातू राजकारणात कधी प्रवेश करेन याकडे संपूर्ण करमाळा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. पण योग्य वेळी ते तालूक्याच्या राजकारणात सक्रीय होतील. आमदार नारायण आबा पाटील यांना आमदार पदावर निवडुन येण्यासाठी दोन दशकाहून अधिक काळ लागला. अनेक संकटाचा सामना करत आबासाहेब यांचे नेतृत्व सरपंच पदापासून ते आमदार पदापर्यंतचा संघर्षमय प्रवास करत जनतेच्या हृदयात स्थान मिळवून आहे. कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांच्या त्यागाचा वारसा भैय्यासाहेब अवश्य पुढे चालू ठेवतीलही पण आबासाहेब यांच्यासारखा संघर्ष त्यांच्या वाटेला येणार नाही याची काळजी पाटील गटातील प्रत्येक कार्यकर्ता घेईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ही निवडणुक पाटील गटासाठी महत्वाची असणार आहे. भैय्यासाहेब या निवडणुकीत उतरतील की नाही हे आताच सांगता येणार नाही. पण योग्यवेळी भैय्यासाहेब यांची तालूका पातळीवरील राजकारणात मोठ्या दिमाखात एन्ट्री होईल.
- सुनील तळेकर (प्रवक्ते, आमदार पाटील गट)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा