*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाला मोठा धक्का दिला आहे आरक्षणासंदर्भात जुने निर्णय रद्द केल्याने मुस्लीम समाजाला आजुन दारिद्र्याच्या खाईत लोटले आहे. मुस्लीम समाजाची इतर समाजाबरोबर आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी केंद्र सरकारने सच्चर कमिटीची स्थापना करुन त्याचा स्वीकार करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी शिफारस केली होती परंतु सर्व राजकीय पक्षांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे मुस्लीम समाजाला आजपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळूं शकला नाही त्यामुळे ज्या समाजाला खर्या आर्थाने आरक्षणाची गरज आहे त्याच समाजाला आरक्षण मिळाले नाही.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी एक अत्यंत दुर्दैवी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयाद्वारे, मुस्लिम समाजातील विशेष मागास प्रवर्ग-अ अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचे जुने सर्व शासन निर्णय आणि परिपत्रक अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहेत. म्हणजेच मुस्लिम समाजाला मिळणारे आरक्षण रद्द करण्यात आले!
आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो ,२०१४ मध्ये शैक्षणिक आणि नोकरीसाठी जे ५% आरक्षण जाहीर झाले होते, त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याऐवजी, सरकारने जुन्या प्रक्रियाच रद्द करून टाकल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीचे आणि अध्यादेश कालबाह्य झाल्याचे कारण देऊन सरकारने मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणली आहे.
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे आणि दुसरीकडे आरक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवण्याचे मार्ग बंद करायचे, हा दुटप्पीपणा नाही का? मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण मान्य केलेले असतानाही, महाराष्ट्रात आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. न्यायालयाने मंजूर केलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने न करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे.
समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना पुन्हा अंधारात ढकलण्याचे काम झाले आहे. या करिता आमची सत्तेतील राज्य सरकारला व सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की आपण तरी मुस्लीम समाजाला इतर समाजाबरोबर योग्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे व अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सकल मुस्लीम समाज करमाळा व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन आणि रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करत आहोत.
यावेळी सकल मुस्लीम समाज चे शहर अध्यक्ष जमीर सय्यद रोहित पवार फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठाण, एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे अध्यक्ष हाजी लियाकत शेख, रहनुमा ट्रस्ट चे सचिव सुरज शेख, अब्दुल कलाम फाऊंडेशन चे सचिव रमजान बेग, उपाध्यक्ष फिरोज बेग, मौलाना मोहसीन, मुफ्ती अबु रेहान, मौलाना फारुख रझा शाह, मौलाना अन्वर, मौलाना मरगबुल हसन, मौलाना सिकंदर, मौलाना सय्यद अली सहाब, अॅड नईम काझी, अॅड अलिम पठाण, नगरसेवक हुमरान मुलाणी, कलंदर शेख, इमित्याज पठाण, उपाध्यक्ष आझाद शेख, इकबाल शेख, डॉ समीर बागवान, प्रा इबाहिम मुजावर, खलील कुरेशी, सुपरान शेख, शाहरुख शेख, गुलाम गौस कुरेशी, उमेर शेख, आदि मुस्लिम कार्यकर्त्यांनी केली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा