बी.टी.शिवशरण
श्रीपूर
*माननीय आमदार*
*अभिजीत (आबा ) पाटील*
सप्रेम नमस्कार🙏
*महोदय*
एक कार्यकर्ता ते साखर कारखान्याचा चेअरमन, नंतर आमदार असा आपला अभूतपूर्व प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे,
कारखाना कसा चालवावा, त्याच्या सभासदांना योग्य न्याय कसा मिळेल, याचे चिंतन व मनन करून त्यावर योग्य उपचार करण्यात आपण यशस्वी झालात, आजारी साखर कारखान्यांनी निश्चित आपला आदर्श घेण्यासारखा आहे.
मी एक सामान्य कार्यकर्ता व ज्येष्ठ नागरिक आहे, एवढेच नव्हे तर साखर कारखान्यामध्ये 37 वर्षे सेवा करून 2010 ला सेवानिवृत्त झालो आहे, रात्रीचा दिवस करून, घाम गाळून जो कामगार जगाचे तोंड गोड करण्यासाठी प्रामाणिक सेवा बजावून तीस-पस्तीस वर्षानंतर सेवानिवृत्त होतो, त्यानंतर त्याच्या परिस्थितीकडे फारसे कोणी लक्ष देत नाही.
वाढती महागाई, तुटपुंजी पेन्शन, दा त डोळे कान व गुडघे घेत असलेले निरोप, कुटुंब व समाजाकडून होणारे दुर्लक्ष, त्यातच वाढते वयोमान, लक्ष्मीची अवकृपा यामुळे उर्वरित जीवनात होणारे हाल याचे वर्णन करावयास नको.
थोडक्यात जीवनावश्यक सेवा देणाऱ्या सर्व औद्योगिक क्षेत्रातील सामान्य कामगारांची ही अवस्था आहे,
सर्वसाधारण वरील परिस्थितीला साखर कामगार, एस टी महामंडळ, शेती महामंडळ, एम एस ई बी इत्यादी औद्योगिक क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या वाट्याला ही स्थिती येते. त्यांच्या परिस्थितीकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. हे वास्तव आहे.
त्यांना मिळणाऱ्या तुटपुंजाEPS_95 या पेन्शनलाही कधीच वाढ किंवा महागाई भत्ता मिळत नाही, यासाठी केंद्र शासनाकडे आम्ही न्याय मार्गाने गेली दहा-पंधरा वर्षे मागणी करत आहोत, पण आमची कोणतीही दखल घेतली जात नाही, हे आमचे मोठे दुर्दैव आहे,
महोदय
अशा प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून, हरियाणा सरकारने गेल्या वर्षी त्यांच्या राज्यातील सर्व 65 वर्षावरील, सर्व वृद्धांना दरमहा रुपये 3000 एवढी पेन्शन देऊ केली आहे, की ज्यायोगे वृद्धांना थोडेफार सन्मानाने जगता यावे,
विशेष म्हणजे या राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून, त्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना ही भेट देऊ केली आहे,
आपण एक अभ्यासू, सामान्यांची जाण असणारे, संवेदनशील व विरोधी पक्षातील एक लढवय्ये आमदार म्हणून आम्ही आपणाकडे पाहतो,
*महोदय*
अनेक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने, मी आपणास नम्र विनंती करू इच्छितो की, हरियाणा सरकारच्या धरतीवर महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांना (दरमहा किमान रुपये 5000) पेन्शन योजना लागू करण्यासाठी, विधानसभेमध्ये आपण शासनाला विनंती करावी, की महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठांचा आवाज शासनापर्यंत पोहोचेल.
लाडक्या बहिण योजनेप्रमाणे *महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना* *सन्मानाने जगता येईल.*
महोदय
अतिशय पोट तिडकीने आपण आम्हा जेष्ठांचा आवाज, चालू अधिवेशनामध्ये शासन दरबारी मांडावा व ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत,
*एवढे कराच ही विनंती* 🙏
आपला विश्वासू
अरुण कुलकर्णी मार्डीकर
श्रीपुर मोबा, 97 63 26 88 68




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा