*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
अहान इरफान शेख या सहा वर्षाच्या मुलाने इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यातील पहिला रोजा पुर्ण केला.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) दिवसभर अन्न-पाणी वर्ज्य करून चौदा तास कडक उपवास करतात.
अहान शेख हा कुरकुंभ ता.दौंड येथील माल वाहतूक व्यवसायिक अजिज शेख यांचा नातू व इरफान शेख यांचा मुलगा आहे.अहान याने अल्पवयात कडक उपवास (रोजा) यशस्वीपणे पूर्ण केला.
उपवासाच्या सांगता वेळी अहान चा नवीन कपडे, पुष्पहार व फलाहार देऊन सत्कार करण्यात आला. अहान ने इस्लाम धर्माच्या रितीरीवाजानुसार रोजा यशस्वीपणे पुर्ण केल्या बद्दल त्याचे आजोबा करमाळयाचे जेष्ठ पत्रकार नासीर कबीर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा