Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

अणदूर ता.तुळजापूर येथे जि. प. पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने काँग्रेस शिवसेना उ.बा.ठा उमेदवारच्या प्रचारार्थ सभा

 *संपादक -*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


अणदूर ता. तुळजापूर येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.

या सभेमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, शेतकरी, महिला सक्षमीकरण व युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम आदी विविध विकासकामांचा ठोस लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात आला.




"आम्ही केवळ आश्वासनांचे नाही तर प्रत्यक्ष कामांचे राजकारण करतो. केलेल्या कामांच्या विश्वासावरच ही निवडणूक लढवत आहोत,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.




डॉ. श्री. जितेंद्र गुरुनाथ कानडे व श्री. संजय चनबस भोसले यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. उमेदवारांनी प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार व लोकहितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

सभेला शिवसैनिकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा