Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

ड्रग्स तस्करी प्रकरणी करमाळा येथील मकसुद बागवान फरारी आरोपीस जामखेड पोलिसांनी केली अटक. जामखेड ड्रग्स प्रकरणाचा थेट करमाळा कनेक्शन करमाळा शहरात मात्र एकच खळबळ...

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



जामखेड येथील ड्रग्स तस्करी प्रकरणाचा थेट करमाळा कनेक्शन असून याप्रकरणी जामखेड पोलिसांनी ड्रग्स तस्करी प्रकरणांमध्ये जामखेड येथील एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी करमाळा येथील मकसुद बागवान होता त्या   फरारी असलेल्या आरोपीस  जामखेड येथील एलसीबी गुन्हा अन्वेषण खात्याने अटक केली असून  करमाळा पोलिसांचा ना कर्ते पणा. चव्हाट्यावर आला आहे

याबाबतची सविस्तर माहिती अशी की मंगेश हिरामण पवार वय 30 राहणार कानोपात्रा नगर जामखेड हा ट्रक्स विक्रीसाठी जामखेड कर्जत रोडवरील वैशाली फर्निचर दुकानासमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार जामखेड पोलिसांकडून सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आली आहे त्यांच्या छाप्यात 6.17 ग्रॅम मेफे ड्रोन एमडी किंमत एक लाख तीस हजार चारशे रुपये व एक लाख रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण दोन लाख 23 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीने हा अमली पदार्थ करमाळा येथील रहिवासी मकसूद जाफर बागवान वय 30 राहणार कर्जत रोड यांच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने दिली या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉटेबल गौतम घोडके यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये दोघा विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही एक अहिल्यानगर येथील जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयकुमार कबाडी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे

ड्रग्स प्रकरणी जामखेडच्या एलसीबी गुन्हा अन्वेषण पोलीस खात्याने पकडलेल्या आरोपीकडून माहिती घेतली असता सदरच्या आरोपीने आपण सदरचे ड्रग्स करमाळा येथील मकसूद बागवान यांच्याकडून आणले असल्याची माहिती दिली आहे याचाच अर्थ जामखेड ड्रग्स चा थेट करमाळा कनेक्शन असून याबाबत करमाळा पोलीस देखील या घटनेचा शोध घेत आहे या ड्रग्स प्रकरणांमध्ये आणखीन किती आरोपी सापडतात याचा शोध सध्या करमाळा पोलीस घेत आहे 


                         --- : चौकट :-----

करमाळा पोलीसाच्या निष्क्रियतेबद्दल होत आहे तीव्र संताप 

करमाळा शहरातील कर्जत रोड कडे राहणाऱ्या एका युवकाकडे राजरोसपणे पांढरे विष अर्थात ड्रग्स सापडत असल्याने व त्याचा करमाळा पोलिसांना कसलाही थांग पत्ता व सुगावा नसल्याने करमाळा पोलीस खात्याविषयी व त्यांच्या निष्क्रियते बद्दल करमाळा शहरात संतापाची लाट निर्माण झाली आहे निद्रिस्त झालेले करमाळा पोलीस खाते आता कुठे जामखेड पोलिसाच्या कारवाईनंतर जागे झाले आहे करमाळा पोलीस आता या प्रकरणात कोणती कारवाई करतात याकडे संपूर्ण करमाळा शहर तसेच तालुक्याचे लक्ष लागले आहे वास्तविक पाहता ही कारवाई करमाळा पोलिसांनी करायला हवी होती मात्र हात ओले झाल्याने करमाळा पोलिसांनी त्याला अटक केली नाही अशी नागरिकांच्या होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा