*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळा तालुक्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली . या भेटीदरम्यान माजी आमदार जगताप यांनी भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला दिलेल्या समर्थनाबद्दल पालकमंत्री ना . गोरे यांनी त्यांचे विशेष आभार मानले . यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ,आगामी काळातील विकास कामांवर तसेच करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. महायुतीच्या माध्यमातून जिल्हा स्थिर व सक्षम प्रशासन निर्माण करण्याची चर्चा झाली असून, त्याचा लाभ ग्रामीण भागाच्या विकासासाठी निश्चितच होईल असा विश्वास पालकमंत्री ना. गोरे यांनी व्यक्त केला. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही आपल्या भूमिका स्पष्ट करताना तालुका व जिल्ह्याच्या हितासाठी योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याची त्यांनी नमूद केले. तसेच राज्यात पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते देशभक्त नामदेवरावजी जगताप यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष पद भूषविले होते ,त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे व जगताप कुटुंबियांचे एक आगळे वेगळे व भावनिक नाते आहे .त्यामुळे या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेची प्रतिष्ठा व ग्रामीण भागाचा विकास हा एकच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पॅनलला पाठिंबा दिल्याचे देखील जगताप यांनी यावेळी नमूद केले .या सदिच्छा भेटी प्रसंगी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर ,भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल, विलासराव घुमरे ,गणेश चिवटे ,मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक सतीश निळ, बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, जनार्दन नलवडे ,खरेदी विक्री संघाचे संचालक शहाजी शिंगटेआदी मान्यवर उपस्थित होते. या भेटीमुळे करमाळा तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा