Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

*अकलूज नगर परिषद प्रशासन व पदाधिकारी इतर नगर परिषदेचे अनुकरण करून व्याजदंडाबाबत नागरिकांना दिलासा देतील काय?*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448/*

*9421577488*



अकलूज नगर परिषद कडून नगरपरिषद हद्दीतील कर विभागाकडे थकीत मालमत्ता कर व्याजदंडासह वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक घंटागाडीवर मालमत्ता कर भरण्यासंबंधी दवंडी दिली जात आहे मालमत्ता कर भरणे नागरिकांना बंधनकारक आहे मात्र त्या थकीत रकमेला शास्ती कर दंड व्याज इत्यादी कर लावून वसूल करण्याची प्रक्रिया अकलूज नगर परिषद स्थापन झाल्यापासून चालू आहे दोन दिवसा पूर्वी बार्शी नगर परिषदेत कर विभागा कडील थकीत मालमत्ता करा वरील दंड व व्याज माफ करून कर वसूल करण्यासाठी नागरिकांना  प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची अभय योजना चालू करण्याबाबत चा प्रस्ताव सादर करण्याच्या विषयासह एकूण तीन विषयांना सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देऊन बार्शीकरांना बार्शी नगरपरिषदेने दिलासा दिला 


           👆  हे पहा बार्शी नगर परिषदेने दंड व्याज माफ केलेले वृत्त

      मात्र अकलूज नगर परिषदेतील नगराध्यक्ष आणि  पदाधिकारी यांना असे का वाटत नाही का ,की आपण ही व्यासदंड कमी करून थकित कर वसूल करावा  नागरिकांना सवलत द्यावी त्या संदर्भात नगरपरिषद  पदाधिकाऱ्यांनी ने सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा करून योग्य तो नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा असे नागरिकांतून चर्चा होत आहे 

     जर नगरपरिषद प्रशासनाने व्यासदंड इतर कर माफ केले तर नक्कीच नागरिकांना प्रोत्साहन मिळून नागरिकाकडील कर मोठ्या प्रमाणात वसूल होईल यात काडी मात्र शंका नाही सरकार बड्या बड्या उद्योजकांना त्यांचे कोट्यावधी अब्जावदीकर्ज माफ करू शकतात तर सर्वसामान्य गोरगरिबांचे किरकोळ हजार  दंड व्याज का माफ करू शकत नाही? इतर नगर परिषदा, दंड व्याज माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतात तर मग अकलूज नगर परिषद हा निर्णय घेऊ शकत नाही का? असेही नागरिकांतून बोलले जात आहे 

      विशेषतः  सलग 42 दिवस आंदोलन करून अकलूज करांनी नगरपरिषद करण्याची मागणी केली यासाठीच केली का? हरभऱे खाऊ घालून घोडे ....... अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत,मुळातच मजुरांच्या  हाताला काम नाही छोट्या व्यवसायिकांना व्यवसाय नाही तसेच उंच शिखरावर पोहोचलेली वाढती महागाई व्यवसाय मध्ये असलेली गडद मंदी त्यामुळे सर्वसामान्यांना प्रपंचाचा गाडा हाकने जिकरीचे झाले असताना सर्वसामान्य नागरिकांवर व्याजदंडाचा बोजा लावून पठाणी.... कर वसूल करत आहेत.

नियमित घरपट्टी पाणीपट्टी भरणारा यांनाही सदरचे आर्थिक वर्ष संपण्याआधीच व्याज आकारले जात आहे वास्तविक इतर नगरपरिषदात वर्ष संपण्याच्या आत भरणाऱ्या नागरिकांना विशेष सवलत देत असते अकलूज मध्ये मात्र सर्व उलटा कारभार चालू असून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच व्यासदंड आकारला जात आहे

नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी एका पक्षांनी पाचशे स्क्वेअर फुट च्या आत बांधकाम असलेल्या घरांना घरपट्टी कर माफ करण्यात येईल असे वचन दिले होते त्या पक्षाच्या नगरसेवकांनी याचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेऊन जनतेच्या विश्वासास पात्र रहावे आणि त्याची वचनपूर्ती करावी तर आणि तरच जनतेचा विश्वास त्यांच्यावर राहील

    तरी नगरपरिषद प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी याचा गांभीर्यपूर्वक विचार करून नागरिकावर लावलेले दंड व्याज माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा अकलूजकर नागरिकांतून व्यक्त होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा