Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

*माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जयंती निमित्त २२५ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी.*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९


माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी युनिट ११  या कारखान्यातील २२५ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.



 कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधून शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्टच्या शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार  तुषार रंजनकर, विश्वस्त  अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सारंगी कुंभार, नर्स सलोनी दुर्वे, संयोनी कासदेकर, हनुमंत गोफणे व सहकाऱ्यांनी ही आरोग्य तपासणी केली.

कर्मयोगी कारखान्याचे कार्यकारी संचालक विजयसिंह शिर्के, जनरल मॅनेजर रणजीत तावरे, श्री. जमदाडे साहेब, चेन मॅनेजर बबन हुलगे, मुख्य शेतकी अधिकारी किशोर हिंगमिरे, शेतकी अधिकारी कांतीलाल  टेळे, चीफ अकाउंट श्री. फुले साहेब, ऊस पुरवठा अधिकारी गणेश पोळ, विधी सल्लागार रामदास नरूटे, एच आर मॅनेजर अंकुश माने, लेबर सुपरवायझर नवनाथ व्यवहारे, लेबर सुपरवायझर अनिल व्यवहारे यांचे या शिबिरासाठी सहकार्य लाभले. 

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर,  मार्गदर्शक हमीदभाई आतार, आरोग्य केंद्र प्रमुख महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा प्रमुख भारत बोराटे, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे, केदार गोसावी उपस्थित होते.

यावेळी केवळ औषधोपचार यावर भर न प्रतिबंधात्मक आरोग्य सल्ल्यावरही  भर देण्यात आला. कामगारांच्या आरोग्याप्रती दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल कारखान्यातील कर्मचारी वर्गाने ट्रस्टचे मनापासून आभार मानले. या उपक्रमाद्वारे शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकीचा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर आणि कामगार वर्गाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, हा कर्मयोगींचा मूळ विचार केंद्रस्थानी ठेवून या आरोग्य केंद्राचे कामकाज अविरत सुरू आहे. आगामी काळातही अशाच प्रकारे विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा मानस ट्रस्टच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा