Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

जेऊर ता.करमाळा येथे आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी महावितरणची बैठक....

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा मतदारसंघातील वीजेच्या संदर्भात शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी जेऊर ता. करमाळा येथे महावितरण विभागाची बैठक होणार असून या बैठकीत स्वतः आमदार नारायण आबा पाटील हे महावितरण कडून सध्या चालू असलेला वीजपुरवठा,  वीजेच्या संदर्भात कामे, नियोजित ३३/११ केव्हीए उपवीज केंद्राची सद्यस्थिती तसेच मागील आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक झाली का आदि बाबत माहिती घेणार आहेत. या बैठकीसाठी महावितरण करमाळा विभागाचे उप कार्यकारी अभियंता आशिष कलावते, जेऊर विभागाचे उप कार्यकारी अभियंता प्रभास भोयर व कुर्डुवाडी विभागाचे उप कार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांचेसह करमाळा मतदार संघातील महावितरणचे सर्व शाखा अभियंता तसेच महावितरण कडून करण्यात येत असलेल्या वीजेच्या कामाचे ठेकेदार हे उपस्थित राहणार आहेत.   

                     या बैठकीत विभागानुसार वीजेच्या समस्या, चालू व प्रलंबित कामे तसेच शेतकऱ्यांना सध्या तोंड द्यावे लागत असलेल्या वीजेच्या पुरवठ्या बाबतच्या समस्या यावर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा व नियोजन केले जाणार आहे. सध्या करमाळा तालुक्यातील व माढा तालुक्यातील छत्तीस गावातील रब्बी पिकांचा विचार करुन तसेच उजनी बॅक वॉटर, दहिगाव उपसा तसेच सीना माढा उपसा आणि भीमा सीना जोडकालवा परिसरातील केळी आदि पिकांसाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. उन्हाळ्यामध्ये महावितरण कडून कशाप्रकारे नियोजन करण्यात येणार आहे याबाबतची माहिती या बैठकीत घेतली जाणार आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक जेऊर ता करमाळा येथे शुक्रवारी दिनांक २० फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले. तर यापूर्वी दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतील कामांचा पाठपुरावा म्हणुन या बैठकीत मागील प्रश्नांची सोडवणूक केली गेली का याबाबतही आमदार नारायण आबा पाटील हे महिती घेणार असून शेतकऱ्यांनी आपले वीजे संदर्भातील प्रलंबीत प्रश्न मांडण्यासाठी आपल्याकडून महावितरण कडे सादर केलेली कागदपत्रे, पोहोच, वीजबिले आदि आवश्यक व आपणाकडे असलेली कागदपत्रे बरोबर घेऊन यावीत असे पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा