Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

*काटेगाव ता.बार्शी येथील प्रा.श्रीमती शोभा आडगळे यांचा सेवापुर्ती समारंभाचा कार्यक्रम संपन्न* *मॅडमला सेवापूर्तीचा निरोप देताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले ...*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*

 बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका श्रीमती शोभा आडगळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सेवापुर्ती समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहमय वातावरणात काटेगाव येथे पार पडला यावेळी सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील शिक्षक विभागाचे आमदार जयंत आसगावकर हे उपस्थित होते 


यावेळी प्रमुख पाहुणे आमदार आसगावकर बोलताना म्हणाले की बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका आडगळे ह्या मॅडमची सेवा आदर्श अशी सेवा होती त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये उत्कृष्टमय अशी सेवा बजावली आहे त्यांनी अविरतपणे एकूण 35 वर्षे चांगली सेवा दिली त्यांच्या सेवेचा आदर्श इतरांनी घ्यावा असे ते बोलताना म्हणाले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी घडविले त्यांचे विद्यार्थी आजही राज्य पातळीवर व देश पातळीवर मोठ्या पदावर कार्यरत आहे अशा या शिक्षिकेचा सेवापुर्तीचा कार्यक्रम म्हणजे एक आनंदाचा व आगळा वेगळा सेवापुर्तीचा कार्यक्रम  म्हणावा लागेल असे आमदार आसगावकर बोलताना म्हणाले

याच वेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे यांनीही आडगळे मॅडम विषयी आपले चांगले मत व्यक्त केले याचवेळी आडगळे मॅडम यांचे पती प्राध्यापक वसंतराव यादव यांनीही आपल्या खास भाषणाच्या शैलीतून त्यांनी आपल्या धर्मपत्नी आडगळे मॅडम विषयी मनोगत व्यक्त केले 

या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला माजी प्राचार्य चंद्रकांत मोरे तसेच महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेजचे शिक्षक सी एस मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक ए वाय पाटील संस्थेचे पदाधिकारी विष्णू पाटील भालके सर विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका माजी विद्यार्थी तसेच गावातील संख्या ग्रामस्थ सदरच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते 

एकंदर पाहता श्रीमती शोभा अडगळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाला काटेगाव येथील सर्व स्तरातील नागरिक तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी आडगळे मॅडम यांना निरोप देताना अनेक विद्यार्थी वर्गाचे डोळे पाणावले होते 

यावेळी सेवापुर्ती निमित्त श्रीमती आडगळे मॅडमच्या वतीने जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. एकंदर पाहता सदर सेवा निवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामुळे वातावरणात काटेगाव येथे पार पडला


                        -----:चौकट :----

 विद्यार्थी वर्गांचे अखेर डोळे पानावले 

बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती शोभा आडगळे यांच्या सेवापुर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींचे मॅडम यांच्या सेवापुर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांचे डोळे अक्षरशा पानावले होते कारण मॅडम यांनी विद्यार्थी वर्गांना आपल्या मायेच्या सावलीसारखे शिक्षण दिले होते त्यांनी अनेक विद्यार्थी त्यांच्या कालखंडामध्ये घडविले होते अखेर मॅडम यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना रडू कोसळले अशा या काटेगाव येथील श्रीमती आडगळे ह्या शिक्षिकेच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम एक कायम स्वरूपात स्मरणात राहील अशा पद्धतीने मोठ्या उत्साहमय वातावरणात पार पडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा