Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

*घरतवाडीतील मतदान बहिष्कार तात्पुरता मागे...* *पालकमंत्री कार्यालयाच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीची कार्यवाही करण्याचे आदेश*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


करमाळा तालुक्यातील घरतवाडी (घरतवाडी परिसरासह) येथील ग्रामस्थांनी जाहीर केलेला मतदानावरील बहिष्कार तात्पुरता मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बहिष्काराच्या संदर्भात ग्रामस्थांनी केलेल्या ठाम चर्चेची दखल घेत पालकमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

घरातवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत व मुख्य रस्त्यांची कामे प्रलंबित असून, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ यामुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान ग्रामसभेत एकमताने मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतचा ठरावही अधिकृतरीत्या पारित करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची दखल घेत पालकमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत माहिती देताना मा. सदस्य ग्रामपंचायत कुंभारगाव अनिकेत गायकवाड यांनी सांगितले,

“आमच्या घरतवाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नव्हती. मात्र, आता पालकमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीची कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार तात्पुरता मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी वेळेत न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या बहिष्कार मागे घेतल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा