Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते, विचारवंत व एकात्म मानववाद या तत्त्वज्ञानाचे जनक होते,,,,,,, मा. बाळासाहेब कुंभार

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा प्रतिनिधी 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला  ते भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते, विचारवंत आणि 'एकात्म मानववाद'  या तत्त्वज्ञानाचे जनक होते असे मत भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार यांनी व्यक्त केले ते मौलाली नगर येथे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त

अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी प्रतिमेची नगरसेवक सुनील बापू सावंत यांच्या हस्ते प्रतिमेची पूजन करण्यात आले 

. पुढे बोलताना श्री कुंभार म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  चे प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी देशसेवा केली. मथुरा येथे जन्मलेले उपाध्याय एक साधे जीवन जगणारे, प्रखर राष्ट्रवादी आणि उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्य असलेले नेते होते 

 लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांचे बालपण खूप कठीण परिस्थितीत गेले, तरीही त्यांनी शिक्षणात मोलाची कामगिरी केली 

 त्यांनी 'एकात्म मानववाद' हा विचार मांडला,  त्यांच्या मते, व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि सृष्टी यांच्यात एकात्मता असायला हवी. 'समाजातील शेवटच्या घटकाचा विकास'अंत्योदय हे त्यांचे उद्दिष्ट होते


आज केंद्राच्या व राज्याच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचे नाव दीनदयालजींच्या नावावर आहेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना अभिप्रेत असणारा कारभार करत आहेत येणाऱ्या पिढीसाठी ते खऱ्या अर्थाने दीपस्तंभ आहेत त्यांच्या विचारांना तुम्ही आम्ही सर्वांनी स्वीकारल्यास हे राष्ट्र खऱ्या अर्थाने बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही

: यावेळेस  नगरसेवक सुनील बापू सावंत यांच्या हस्ते प्रतिमेची पूजन करून अभिवादन करण्यात आले

  यावेळी ह्यूमन राईट चे अध्यक्ष आयुब भाई शेख पत्रकार अशपाक सय्यद ,भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार ,नगरसेवक दादासाहेब इंदलकर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, भाजपा सोशल मीडियाचे प्रमुख नितीन कांबळे, फिरोज मिर्झा, राजेंद्र कळसे ,महम्मद हाफिज कुरैशी आदीं उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा