Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

परांडा येथील आठ वर्षाच्या मोहम्मद मुजावर या चिमुकल्याने केला रमजानचा कडक असा पहिला रोजा पूर्ण

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


मुस्लिम धर्मियांमध्ये पाच तत्वा पैकी रोजाला विशेष महत्त्व आहे सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिना चालू झाला आहे अशा या कडक रमजानच्या महिन्यामध्ये दुसरा रोजा परांडा शहरातील मोहम्मद सरफराज मुजावर या आठ वर्षीय चिमुकल्याने रमजानचा रोजा पूर्ण केला अवघ्या अल्पवयात त्यांनी असा हा कडक रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्व स्तरातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे मोहम्मद ने अगदी लहान वयात शुक्रवार अर्थात जुम्मा ची नमाज अदा करून उपवास सोडला कडक उन्हाची कसलीही तमा न बाळगता अगदी लहान वयात त्यांनी रमजान मधील एक दिवसाचा रोजा पूर्ण केला



परांडा शहरातील मंगळवार पेठ मधील मुजावर गल्ली येथे राहणारे रहिवासी सरफराज उमर मुजावर यांचे ते चिरंजीव आहेत  मोहम्मद मुजावर या आठ वर्षीय चिमुकल्याने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला आहे त्याने सदरचा रोजा उपवास परंडा शहरातील मुजावर गल्ली मधील मुजावर मशिदीमध्ये सोडला  यावेळी मौलाना जफरअली काझी,  नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर, उमर मुजावर, सरफराज मुजावर सहित मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्प वयात रोजा करणारा मोहम्मद मुजावर हा परांडा येथील नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर यांचा पुतण्या तर करमाळा येथील पत्रकार अलीम शेख यांचा भाचा आहे

  अगदी लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे मुस्लिम समाजा मधून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे त्याला या कामी आई एडवोकेट फातिमा मुजावर, वडील सरफराज मुजावर, तसेच आजोबा उमर मुजावर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा