कार्यकारी संपादक
एस.बी. तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-8378081147
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला तलवार व कोयत्यासारखी धारदार हत्यारे बाळगताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रूई ब्रिज परिसरात करण्यात आली.
दि.२ फेब्रुवारी रोजी बारामती तालुका पोलीस निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू असताना एका बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. एका होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून एक इसम तलवार व कोयता बाळगून एमआयडीसीकडून भवानी नगरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला. रूई ब्रिजखाली संशयित दुचाकी अडवून तपास केला असता ओंकार रामचंद्र काळे (वय १९ रा. सणसर ता. इंदापूर जि.पुणे) असे आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्याच्या दुचाकीच्या डाव्या बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून दोन लोखंडी तलवारी व एक धारदार कोयता मिळून आला. पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी झडती घेऊन ही सर्व हत्यारे तसेच दुचाकी जप्त केली. यात
होंडा युनिकॉर्न दुचाकी (एम.एच. ४२ बी.जी ७३७७) अंदाजे किंमत ३०,००० रु.,पितळी मुठ असलेली तलवार (६७ सेमी) अंदाजे किंमत १,५०० रु, लोखंडी तलवार (४५ सेमी) अंदाजे किंमत ५०० रु, लोखंडी धारदार कोयता अंदाजे किंमत ३०० रु. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ३२,३०० रु इतकी आहे.
बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगल्याप्रकरणी आरोपी ओंकार काळे याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक बारामती तालुका आणि पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ मनोज पवार अवधूत शिंदे भारत खारतोडे दादा दराडे यांनी केली आहे.
चौकट
'कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, धमकावणे किंवा संशयास्पद हालचाली करताना कोणीही आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
~सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी
कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास किंवा अशा प्रकारांची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधावा. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच.'
~ चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक
चौकट:
'निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणीही कायदा हातात घेऊ नये, गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारामती पोलिसांचे लक्ष आहे. असे काही अनुचित प्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केला तर अशांवर कठोर कारवाई केली जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही.'
~ गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा