Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

अकलूज किरण ज्योती लीनेस क्लबचा शपथविधी सोहळा संपन्न*

 *अकलूज प्रतिनिधी*

*केदार लोहकरे* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लिनेस क्लब  या संघटनेअंतर्गत अकलूज येथे किरण ज्योती लीनेंस क्लबची स्थापना करण्यात आली असून दुसऱ्या वर्षासाठी नव्या संचालक मंडळाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.नवीन संचालक मंडळामध्ये कॅबिनेट ऑफिसर सुप्रिया मुदगल,अध्यक्षा सौ.अंजली कुलकर्णी,सेक्रेटरी मंजिरी जोशी,खजिनदार मोनाली देशपांडे तसेच इतर सदस्य म्हणून श्रद्धा जोशी,वीणा कुलकर्णी,प्राप्ती कुलकर्णी,वैशाली कुलकर्णी आदींची नियुक्ती करण्यात आली.

नियोजित शपथविधी कार्यक्रम महावीर पथ जवळील अग्रवाल हॉल येथे उत्साहात पार पडला. 

         नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यासाठी पास्ट डिस्ट्रिक्ट ऑफिसर लिनेस छाया बुराडे मॅडम यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून रिजनल कॉर्डिनेटर लिनेस राजश्री जगताप उपस्थित होत्या तसेच आनंदी लीनेंस क्लबच्या सेक्रेटरी रश्मी ढोक व सदस्य  संगीता दोशी  यांचीही उपस्थिती होती.

          या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत,गणेश वंदना व प्रार्थना व  दिप प्रज्वलनाने झाली.त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला व 

याप्रसंगी कष्ट करून मुलीला उच्च शिक्षण देणाऱ्या माय-लेकीचा क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच एका गरजू मैत्रिणीला तिच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ५,००० रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.या उपक्रम उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.लिनेस क्लबचे उद्दिष्ट सामाजिक उपक्रम राबविणे,गरजूंना मदतीचा हात देणे, अपंगांना सहाय्य करणे, पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित करणे,अनाथ आश्रम,बालकाश्रम व वृद्धाश्रमातील गरजूंना साहित्य पुरविणे,महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविणे असा मानस असल्याचे कॅबिनेट ऑफिसर सुप्रिया मुदगल यांनी सांगितले.

            हा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ.अंजली कुलकर्णी व सौ.सुप्रिया मुदगल यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संपन्न*

आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लिनेस क्लब  या संघटनेअंतर्गत अकलूज येथे किरण ज्योती लीनेंस क्लबची स्थापना करण्यात आली असून दुसऱ्या वर्षासाठी नव्या संचालक मंडळाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.नवीन संचालक मंडळामध्ये कॅबिनेट ऑफिसर सुप्रिया मुदगल,अध्यक्षा सौ.अंजली कुलकर्णी,सेक्रेटरी मंजिरी जोशी,खजिनदार मोनाली देशपांडे तसेच इतर सदस्य म्हणून श्रद्धा जोशी,वीणा कुलकर्णी,प्राप्ती कुलकर्णी,वैशाली कुलकर्णी आदींची नियुक्ती करण्यात आली.

नियोजित शपथविधी कार्यक्रम महावीर पथ जवळील अग्रवाल हॉल येथे उत्साहात पार पडला. 

         नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यासाठी पास्ट डिस्ट्रिक्ट ऑफिसर लिनेस छाया बुराडे मॅडम यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून रिजनल कॉर्डिनेटर लिनेस राजश्री जगताप उपस्थित होत्या तसेच आनंदी लीनेंस क्लबच्या सेक्रेटरी रश्मी ढोक व सदस्य  संगीता दोशी  यांचीही उपस्थिती होती.

          या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत,गणेश वंदना व प्रार्थना व  दिप प्रज्वलनाने झाली.त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला व 

याप्रसंगी कष्ट करून मुलीला उच्च शिक्षण देणाऱ्या माय-लेकीचा क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच एका गरजू मैत्रिणीला तिच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ५,००० रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.या उपक्रम उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.लिनेस क्लबचे उद्दिष्ट सामाजिक उपक्रम राबविणे,गरजूंना मदतीचा हात देणे, अपंगांना सहाय्य करणे, पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित करणे,अनाथ आश्रम,बालकाश्रम व वृद्धाश्रमातील गरजूंना साहित्य पुरविणे,महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविणे असा मानस असल्याचे कॅबिनेट ऑफिसर सुप्रिया मुदगल यांनी सांगितले.

            हा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ.अंजली कुलकर्णी व सौ.सुप्रिया मुदगल यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा