*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा येथील उत्तमचंद आब्बड व त्यांच्या जीवनसाथी बिजाबाई आब्बड यांच्या वैवाहिक जीवनाच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त सुवर्णमहोत्सवी सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात धर्मसंगीत मंगल कार्यालय येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. करमाळा शहरासह परिसरातील कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संस्मरणीय ठरला
यावेळी सुरेश कर्नावट, ज्येष्ठ पत्रकार ॲड. बाबुराव हिरडे, ॲड सुखलाल लुणावत,माजी नगरसेविका संगीताताई खाटेर, माजी नगराध्यक्ष अमोद संचेती, पिंटु गुगळे प्रकाश बलदोटा, संतोष बलदोटा, सतिश बलदोटा, प्रदीप लुणिया ,अमृत कटारिया, अनिल सोळंकी ,प्रकाश सोळंकी, राजेंद्र सोळंकी ,कचरूशेठ मंडलेचा ,दिलीप मंडलेचा, संजय मंडलेचा दिपक कटारिया,पत्रकार दिनेश मडके,बाळु कटारिया , रितेश कटारिया, रावसाहेब सावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात आपल्या भाषणात तपश्री प्रतिष्ठान गुरू गणेश गणेश दिव्यरत्न गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी आब्बड दांपत्यांच्या सहजीवनाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना सांगितले की, “सुख-दुःखाचा धैर्याने सामना करत समाजात आदर्शवत जीवन जगणारे आब्बड दांपत्य निश्चितच प्रेरणादायी आहे.” पुढे ते म्हणाले की, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ संसारातूनच साध्य होतात. संसारिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत उत्तमचंद व सौ.बिजाबाई आब्बड यांनी आपल्या संततीला योग्य शिक्षण, संस्कार आणि मूल्ये देऊन सक्षम बनविले, हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे.
सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले प्रसिद्ध जैन गायक तरुण मोदी यांचा भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम. त्यांच्या सुमधुर सादरीकरणामुळे सभागृह भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.
यावेळी आब्बड दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व भेटवस्तू देत निरोगी, आनंदी व समृद्ध आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
हा सोहळा त्यांचे जावई अमोल सोळंकी, निलेश लुंकड, प्रितेश कांकारिया, संदेश कर्नावट, राकेश बेदमुथ्था, संतोष चोरडिया, अजित कोचेटा तसेच मुली साधना, नुतन, भाग्यश्री, शशिकला, सुवर्णा यांनी विशेष परिश्रम घेतले. बहिण कमल तसेच पुतणे राजेश व संतोष यांनीही विशेष सहकार्य केले.
जावई व मुलींकडून आयोजित हा सुवर्णमहोत्सवी सन्मान सोहळा आब्बड दांपत्यांच्या जीवनकार्याचे सार्थक ठरला. प्रेरणादायी विचार आणि कुटुंबातील एकोप्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा