*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील कंदर येथील विद्युत मंडळाचे इंजिनिअर तसेच विद्युत मंडळाचे ठेकेदार यांच्यामध्ये झालेल्या वादाचे पडसाद कंदर येथील गावकऱ्यांना गेली 24 तासापासून भोगावे लागत आहे दोघांच्या भांडणाचे पडसाद गेली 24 तासापासून कंदर गाव चक्क अंधारात आहे विद्युत मंडळाचे इंजिनियर यांनी ठेकेदार यांना परमिट दिले नाही याचा राग मनात धरून विद्युत मंडळाच्या ठेकेदाराने चक्क संपूर्ण गावांमधील पुरवठा सकाळी आठ वाजल्यापासून खंडित केला कंदर येथील इंजिनीयर व विद्युत मंडळाचे ठेकेदार यांच्यामध्ये आज सकाळी आठ वाजता शाब्दिक संघर्ष झाला होता याचे पडसाद गावकऱ्यांना भोगावे लागत आहे विद्युत मंडळाचे इंजिनिअर यांनी चक्क विद्युत मंडळाच्या ठेकेदाराबरोबर झालेल्या भांडणाचे पडसाद त्यांनी अखेर आज सकाळी आठ वाजल्यापासून कंदर गावातील विद्युत पुरवठा खंडित केला आहे सध्या कंदर परिसरात बहुसंख्य शेतकरी बांधवांना व ग्रामस्थांना गेली 24 तासापासून विद्युत प्रवाह खंडित केल्याने त्याचे पडसाद नाहक गावकऱ्यांना भोगावे लागत आहे 24 तासाहून अधिक काळ लोटला तरी अद्यापही कंदर शहरातील विद्युत पुरवठा चालू झाला नसल्याचे गावकऱ्यांनी पत्रकार जवळ बोलताना सांगितले
----👇------;चौकट ;-------
गाव वेठीस धरणाऱ्या संबंधित वीज अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करावे,,,,,,,,,,
सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित वीज अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करावे सध्या मुस्लिमांचा पवित्र महिना रमजान चालू आहे या रमजान मध्ये मुस्लिमांना इफ्तार चक्क अंधारात करावी लागली तर तर शेतकरी वर्गांना शेतातील पिकांना पाणी देण्याचे खोळंबले आहे तेव्हा अशा गाव वेठीस धरणाऱ्या विद्युत मंडळातील इंजिनीयरला त्वरित निलंबित करावे अशी मागणी कंदर येथील सरपंच तसेच उपसरपंच व ग्रामस्थांनी केली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा