*डॉ.सलिम शाहिदा सिकंदर शेख-*
*बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी *दवाखाना*
*श्रीरामपूर*
*मोबाईल :- ९२७१६४००१४*
(1) दिव्य कुरआन म्हणतो , !! "ईस मिट्टी से हमने तुम्हें पैदा किया , और , ईसी मिट्टी में हम तुम्हे लौटाऐंगैं , और , ईसी मिट्टी से तुम्हें दुबारा उठायंगे ! '.
अर्थात:-" आम्ही तुम्हाला याच मातीतुन जन्म दिला ,
आणि , याच मातीत तुम्हाला दफन (मृत्यू) करून मिसळू ,
आणि , पुन्हा याच मातीतून दुसऱ्यांदा पुनर्जन्म देवू ( प्रलयकाळ - कायमत चा दिवस )."
(2). मनुष्य हा विचार करतो की, काय? मी मरण पावल्यानंतर , मला पुन्हा जिवंत करून उठवलं जाईल?? ( सुरहा नं. 19 अल -मरियम आ नं. 66 ).
पुन्हा,
दिव्य कुरआन म्हणते, " मनुष्याला हीं साधी गोष्ट हीं आठवत नाहीं, की, आम्ही त्याला या आधी हीं जन्माला घातलं आहेत, जेव्हा तो कधीच नव्हता?? सु. नं 19 अल -मारियम आ नं. 67)
(3),दिव्य कुरआन म्हणतो," तोच तर आहे,जो तुमच्या मातेच्या गर्भाशयात तुमचे हवे तसे रुप घडवितो,त्या जबरदस्त बुध्दिमाननाशिवाय इतर कोणी ही अल्लाह (ईश्वर) नाही." (सुराह अल -ईमरान ).
जगात प्रत्येकाला अल्लाह (ईश्वरा) ने काही तरी चांगल्या कामासाठीच जन्म दिला आहे, प्रत्येक मनुष्य - प्राणी -पक्षी -कीटक - जीव जंतू हा चांगल्या कामासाठीच जन्म झाला आहे. प्रत्येक जीव हा फार महत्वाचा घटक ( व्ही. आय. पी. प्रतेक जन ) अवश्यक आहे. कोणीही बेकार जन्माला आला नाहीत, प्रत्येकाचं काम जबाबदारीच संपूर्णपणे वेग-वेगळ्या प्रकारचे आहेत. प्रत्येक जीव एकमेकांसाठी खास आहेत , वेगळा असूच शकत नाहीत. प्रत्येकांना एकमेकांची गरज असते. परंतु हें मनुष्य समजत नाही. तो स्वतःच्याच मस्तित वावरत असतो. मी -मीच - माझं -माझ्याच माझ्या करीताच विचार करत असतो, रुपावर -तारुण्यांवर - जवानीवर - दौलतीवर - स्वतः च्या पैशाच्या जोरावर घमेंड करतो. त्याच घमेंडी वर इतर लोकांना त्रास देत असतो . शेखी मिरवत इतरत फुशारक्या मारत असतो. या सर्व गोष्टींमुळे तो वेगवेगळ्या वाईट सवयी स्वतःला लावून घेत असतो . स्टेटस सिम्बॉल म्हणून दुसऱ्यांना हिनवत दुसऱ्यांना तुच्छतेने पाहात असतो. त्या घुंधित वारंवार चुकाच करीत असतो, त्याला हे समजत नसते की हे सर्व एका दिवशी संपणार आहेत . हे सर्व मान्य अंतिम सत्य आहे हे कोणीही टाळू व नाकारु शकत नाही. हा जन्म -मृत्यूचा फेरा आहेत, कुणालाही चुकणारा नाहीत.
सत्य व असत्य, सन्मार्ग व वाममार्ग, न्याय, अन्याय, पाप व पुण्य, सदाचार व दुराचार, ईश्वराचे आज्ञापालन व अ्वज्ञा हें सम समान असूच शकत नाहीं, हें वेगवेगळे आहेत, सत्कार्माचा चांगला आणि दुशकर्मा चा वाईट परिणाम हा असलाच पाहिजे. आपण कधी कधी असें हीं पाहतो की, सत्कार्मा करणाऱ्याला पुरस्कार व दुष्कार्म करणाऱ्याला शिक्षा मिळेलच असं कधी पाहवयास भेटत नाहीं, कधी आपण असें हीं बघतोय की, सन्मार्गी सदाचारी लोकं संकट आणि त्रास हाल अपेष्टा सहन करून जीवन जगतात तर आईश करणारे, वाममार्ग, चैन, चोरी चपाटे करणारे मज्जा करतात, ऐश आरामात थाठात राहतात.
मनुष्याचा अंतरात्मा निषपेक्ष न्यायाची अपेक्षा करतो. दुष्ट आत्याचारी, दुष्ट प्रवृत्ती, दुराचारी, भ्रस्टाचारी, लोकांना मानवतेवर अन्याय केला म्हणून कठोर शिक्षा व्हावी. जें लोकं सदाचारी राहिलेत कोणत्याही प्रलोभांनां कधीच बळी नं पडता कायम आहेत त्या परिस्थिती मध्ये हीं मानवतेची निस्वार्थी पणे सेवाच केली, लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन घालवले अशा सदाचारी लोकांना त्यांच्या सत्कार्माचा चांगला मोबदला मिळावा. ह प्रत्येक सदाचारी व्यक्तीची अपेक्षा असतं. परंतु जगात असं घडताना दिसत नाहीं.
असं बघून विचार येतो की, येवढ करून आपल्याला काय फळं भेटलीस, हीं अंधेर नगरीं आहेत, हीं सृष्टी अन्यायीनां बळ देते वगैरे. आणि हें सर्व आपला सृष्टीचा निर्मिक निर्माता ईश्वर परमेश्वर त्यांना मोकळीक देतोय आणि उघड्या डोळयांनी सर्व पाहतोय. परंतु हें सर्व खोटं आहेत. विश्वाचा निर्माता त्यांना सूट मोकळीक देऊन त्यांच्या कर्माची परीक्षा घेत असतोस . व्यक्तीच्या विवेक बुद्धीची हीं परीक्षा आहे की संपूर्ण स्वातंत्र्य व अपार क्षमता मिळाल्यावर तो कोणता कसा मार्ग निवडतो हें निर्माण कर्त्याला पाहायचं असतं. तो त्याचा कसा वापर करतो. तो सत्कार्म क दुष्कर्म करतोय हें तो पाहतोय. आणि त्याच साठी त्याला ढील - सूट दिलेली असते.
जग हें प्रत्येक मानवाचं परीक्षा स्थळ असल्यानें येथे पुर्ण न्याय होऊ शकत नाहीत, संपूर्ण न्याय परीक्षा काळ संपल्यावर च होणार, याचाच अर्थ मृत्यू नंतर मानवास पुन्हा जीवतं करण्यात येईल व त्याच्या संपूर्ण प्रत्येक कर्मा चा हिशोब घेतलाच जाईल. परलौकिक जीवणा च्या धारणे शिवाय संपूर्ण न्यायनिवडया शिवाय हें विश्व चा न्याय हें अपूर्ण.
दिव्य कुरआन म्हणते, " निच्छितच आम्ही मेलेल्याना जिवंत करू आणि आम्ही त्यांच्या कर्माचा हिशोब, ( रेकॉर्ड ) तयार करीत असतो , जी कर्मे ते पुढे पाठवतात आणि जी आपल्या मागे सोडतात. एका स्पष्ट ग्रंथात प्रत्येक गोष्टीची आम्ही नोंद केलेली आहे. ( सुरहा नं. 36, यासीन आ नं. 12).
परमेश्वर अल्लाह नें न्यायनिवडया साठी एक वेळ निच्छित केलेली आहेत, ईश्वराने मनावासाठी या जगात जी कालमर्यादा ठरवलेली आहेत ती समाप्त जगाचा शेवट होणार आहे. सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्रे हें सर्व निखळून पडतील, आकाश गुंडाळलं जाईल, सागरांना आग लागेल, पिंजलेल्या कापसा प्रमाणे पर्वत हवेत तारगले जातील, पृथ्वी आपल्या पोटातील सर्व रहश्य ओकून टाकेल, प्रचंड मोठा आवाज होऊन पृथ्वी सपाट मैदान होईल. तोच दिवस" कायमत" चा अर्थातच महाप्रलंयाचा असेंल. तोच दिवस मोबदल्याचा असेल. तो कधी येणार हें फक्त्त परमेश्वर - अल्लाहलाच ठाऊक माहित. परंतु तो दिवस येणारच हें निश्चित.
महाप्रलंय ( कायमत ) च्या न्यायनिवडया च्या दिवस अल्लाह ( ईश्वर ) न्यायालय प्रस्थापित करून सृष्टीच्या जन्मापासूनच्या अंता पर्यतच्या जें जें मनावानी जन्म घेतलं त्या सर्वाना आपल्या मुळरूपात पुनर्जन्म देऊन - जीवित करून आपल्या न्यायालयात हजर करून सृष्टीच्या प्रत्येक मानवाचा जीवसृष्टीचा जीव जंतू ला उभा करून प्रत्येकाला त्यांनी केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब विचारेल, त्यानंतर तुमचे परलौकिक जीवन कसे असेल हें ठरवलं जाईल. ते परलौकिक जीवन अनंत काळ असेल.. ते कधीच नं संपणारे असेल. जगात केलेले कोणतेही कर्म सदाचार असो, की, दुराचार वाया जात नाहीं. प्रत्येक कर्म आपल्या सोबत मोबदला घेऊन येतो. सृष्टीचा निर्माता प्रत्येक कर्माची नोंद करीत असतो व आहे.
आपल्या प्रत्येक कर्माची साक्ष आपलं इंद्रिय देतील, तेथे कनभर हीं अन्याय होणार नाहीं. तेथे फक्त्त एकट्याला उभं राहावं लागेल. तेथे प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्वतःच्या कर्माचे पडेल कोणीच कोणाची मदत करणार नाहीत. स्वतःचे आई वडील सुद्धा काहीच मदत करू शकणार नाहीं.
ज्याच्या सत्कार्माचे पारडे जड राहील त्यांना बक्षीस दिलं जाईल तो पुरस्कार म्हणजे अनंत काळ चिरंतर राहण्याची सोय "जन्नत" ( स्वर्ग ).त्यामध्ये चिरंतर सुख अनंत काळा पर्यंत राहील.
ज्याच्या पारड्यात दुष्कर्म असेल त्यांना मग त्यांचे बक्षीस म्हणजे नरक ( दोजख ) सृष्टी मध्ये केलेल्या दुष्कार्म -दुराचार -भ्रस्टाचार,- वाईट कामं इत्यादी. त्यामध्ये अनंत काळात भडकत्या अग्नी मध्ये कायम जळत राहणं. मग त्यावेळी जागं होऊन काहीच फायदा होणार नाहीं.त्या दिवशी पास्तव्या शिवाय काहीच उरणार नहीं.
दिव्य कुरआन म्हणतो की," तुमची सुंदरता - जवानीचा घमंड -पैशाची घमंड -तुमचं कर्तृत्व - तुमचं कौशल्य (हुनर) सर्व एका दिवशी संपणार आहेत रे, मग तो गर्विष्ठपणा (मी पणा) काय कामाचा ?, काय तुम्ही ऐकले नाहीत की ,प्रत्येक जीवाला एका दिवशी मृत्यू अटळ आहे म्हणून ( सुराह नं.२९ व आ.न.५७ ).
तर जीवनात कायम चांगले काम करत राहणे, चांगल्या गोष्टी शिकणे, परोपकार करणं,आई-वडीलांचा आदर सन्मान करणे,त्यांचा सांभाळ व्यवस्थित करणं,आपल्या मुलांचं संगोपन व्यवस्थित करणं, खासकरून मुलीच्या संगोपन जेवढं चांगले संस्कार देता येईल तेवढे प्रयत्न करीत राहिले पाहिजे.व्यवहार चांगले करणं, विश्वासास पात्र राहणं, कोणाचाही विश्वासघात करु नयेत. जमीनीवर कलह निर्माण करू नयेत .शांततेने रहावे व एकदुसऱ्या बरोबर सदव्यवहार करावं. दुराचार माजू नयेत, अतिरेक तर कधीच करु नयेत .
दिव्य कुर आन म्हणते, " एक दिवस तुम्हाला आमच्याकडे कायम वास्तव्यासाठी येणंच आहे,तर मग येवढं घमंड (गुरुर) काय कामाचं?".
"आम्ही तुम्हाला याच मातीत मिसळणार आहेत ", आणि " याच मातीतून पुन्हा जन्म देऊन उठवणार आहोत."
मृत्यू हे कोणत्याही जीवजंतू व मानवी जीवनातील अंतिम सत्य आहे ,
पवित्र कुरआन म्हणतो ," हर जाणदार चिज को मौत का मजा चखना है ..." म्हणजेच प्रत्येक वस्तू ही नाशवंत आहे, कधी ना कधी तरी मातीत मिसळणार आहेत. तर मग मनुष्य फार वर्ष जगण्यापेक्षा कसा जगला याला किंमत आहे.
म्हणतात ना , जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए.
(क्रमशः)
(कृपया लेखआवडल्यास मित्रां व नातेवाईकांना पाठवा, त्यांना हीं फायदा होईल, आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा .
लेखन :- डॉ.सलिम शाहिदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना
श्रीरामपूर
मोबाईल :- ९२७१६४००१४





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा